(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto Expo 2023: कोणत्या कार होणार लॉन्च, जाणून घ्या ऑटो एक्स्पोची संपूर्ण माहिती
Auto Expo 2023 India: तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठ्या मोटर शोची 16 वे एडिशन 11 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे होणार आहे.
Auto Expo 2023 India: तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठ्या मोटर शोची 16 वे एडिशन 11 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे होणार आहे. या मेगा शोमध्ये अनेक कार उत्पादक, दुचाकी उत्पादक, ईव्ही उत्पादक आणि व्यावसायिक वाहन उत्पादक सहभागी होणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीत ऑटो एक्सपो 2023 ची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
Auto Expo 2023 India: ऑटो एक्सपो 2023 कधी होणार सुरू?
या वर्षी ऑटो एक्सपो 2023 मोटर शो ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथील एक्सपो मार्ट येथे आयोजित केला जाईल. 11 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत ऑटो एक्स्पो मोटर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. 11 आणि 12 जानेवारीचा शो फक्त मीडिया कर्मचार्यांसाठी राखीव आहे. तर 13 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत हा शो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्स्पो मोटर शो सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत लोकांसाठी खुला असेल, तर वीकेंडला त्याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असेल. तसेच या शोच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारीला याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अशी असेल.
Auto Expo 2023 India: कोणत्या कार कंपन्या सहभागी होत आहेत?
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती सुझुकी, बीवायडी इंडिया, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, एमजी मोटर इंडिया, किया इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटरसह अनेक कंपन्यांचा समावेश असेल. महिंद्रासह अनेक कंपन्या या शोमध्ये सहभागी होणार नाहीत.
कोणत्या गाड्या होणार लॉन्च?
ऑटो एक्स्पोमध्ये येणारी काही खास मॉडेल्स म्हणजे मारुती सुझुकी Jimny 5-डोअर, मारुतीची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही, ह्युंदाई आयोनिक 5, ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट, किया सेल्टोस फेसलिफ्ट, किया कार्निवल, किया ईव्ही9 कॉन्सेप्ट, एमजी एअर ईव्ही, एमजी हेक्टर फेसलिफ्ट, टोयोटामध्ये जीआर कोरोला, टाटा पंच ईव्ही, टाटा सफारी फेसलिफ्ट, बीवायडी सील ईव्हीसह अनेक कार समाविष्ट आहेत.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: