आरामदायी SUV खरेदी करायची आहे? तर Audi Q3 खरेदी करण्याची ही आहेत टॉप पाच कारणे
Audi Q3 SUV : ऑडी क्यू3 ही कार तुलनेने अधिक आरामदायी एसयूव्ही कार असून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

मुंबई : तुम्हाला लक्झरी एसयूव्ही खरेदी करायची असेल तर ऑडी क्यू३ सर्वोत्तम कार आहे. या कारमध्ये स्पोर्टी डिझाइन, उच्चस्तरीय वैशिष्ट्ये, दैनंदिन व्यावहारिकता आणि विश्वसनीय ऑडी इंजीनिअरिंगचे परिपूर्ण संयोजन आहे. ही कार प्रीमियम, प्रीमियम प्लस व टेक्नॉलॉजी व्हेरिएण्ट्समध्ये ऑफर करण्यात आली आहे आणि किंमत ४४,९९,००० रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
क्यू३ एण्ट्री-लेव्हल लक्झरी एसयूव्हीपेक्षा अधिक असण्यामागील कारणे पुढे देण्यात आली आहेत - पहिल्यांदाच लक्झरी ऑडीचा अनुभव घ्या.
१. डायनॅमिक डिझाइन, जी प्रत्येक अँगलमधून प्रीमियम दिसते
क्यू३ चे आकर्षक स्टायलिंग लक्ष वेधून घेते; या वेईकलमध्ये आकर्षक अष्टकोनी सिंगलफ्रेम ग्रिल, शार्प एलईडी हेडलॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आहे. ही वेईकल पाच आकर्षक एक्स्टीरिअर रंगांमध्ये शक्तिशाली व आकर्षक दिसते, तसेच नवेरा ब्ल्यू आणि पल्स ऑरेंज या रंगांमध्ये देखील कार येते. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी मोठ्या वेईकलप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
२. दर्जात्मक कार्यक्षमतेसह क्वॉट्रो आत्मविश्वास
क्यू३ ची खासियत म्हणजे २.० लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे १९० एचपी शक्ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते, तसेच कार फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हसह सर्व प्रकारच्या रस्त्यांवर घर्षण, स्थिरता आणि गतीशीलता मिळते. तसेच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह तुम्ही तुमचा मूड व प्रदेशानुसार विविध ड्राइव्ह मोड्समधून निवड करू शकता.
३. तंत्रज्ञानाने युक्त इंटीरिअर, जे दैनंदिन ड्राइव्हला उत्साहित करते
ऑडी क्यू३ च्या आतील बाजूस अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ड्राइव्हरला ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस आणि एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टचच्या माध्यमातून पूर्णत: डिजिटल अनुभव मिळतो, ज्यामधून आकर्षक व्हिज्युअल्स व सर्वोत्तम कंट्रोलची खात्री मिळते. केबिनला ३०-कलर अॅम्बियट लायटिंग पॅकेज, ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग आणि १०-स्पीकर ऑडी साऊंड सिस्टम अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह अधिक सुधारण्यात आले आहे. ही वैशिष्ट्ये हाय-टेक असण्यासोबत संपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवाला अधिक उत्साहित करतात, ज्यामुळे प्रत्येक प्रवास स्मार्टर, आनंददायी आणि अधिक कनेक्टेड होतो.
४. व्यावहारिकतेसह प्रीमियम आरामदायीपणा
कॉम्पॅक्ट आकार असताना देखील क्यू३ मध्ये तिच्या सेगमेंटमधील सर्वात मोठी बूट क्षमता (५३० लीटर), पॉवर-अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह लम्बर सपोर्ट आणि रिअल सीट्ससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्टमेंट आहे. वीकेण्डला रोड ट्रिपवर जायचे असो किंवा दैनंदिन प्रवासावर जायचे असो क्यू३ तुमच्या जीवनशैलीशी प्रभावीपणे जुळून जाते. या कारमध्ये दैनंदिन उपयुक्तता आणि फर्स्ट-क्लास आरामदायीपणाचे परिपूर्ण संतुलन आहे.
५. मन:शांतीसह सुरक्षितता
सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे, जेथे या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट माऊंट्स आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये जसे हिल स्टार्ट असिस्ट, पार्किंग एडसह रिअर-व्ह्यू कॅमेरा व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे.























