एक्स्प्लोर

तबलिघी जमातसाठी गेलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव हा मीडियाचा प्रपोगंडा; औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे

दिल्लीतील तबलिघी जमातसाठी गेलेल्यांनीच देशात कोरोनाचा फैलाव केला, असा अकारण प्रपोगंडा मीडियाने केल्याचे ताशेरे औरंगाबाद खंडपीठाने ओढले आहेत.

औरंगाबाद : दिल्लीतील तबलिघी जमातसाठी गेलेल्यांनीच देशात कोरोनाचा फैलाव केला, असा अकारण प्रपोगंडा मीडियाने केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढले असून महाराष्ट्र पोलिसांनी परदेशी तबलिघींविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द केला आहे. तबलिघींविरूद्ध केलेल्या कारवाईत द्वेषाचा वास येतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. दिल्लीतील मकरझला आलेल्या परदेशी तबलिघींविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोठा प्रपोगंडा केला आणि हे परदेशी तबलिघीच भारतात कोरोना पसरण्यास कारणीभूत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या परदेशी तबलिघींचा अक्षरशः छळवाद मांडण्यात आला, असेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन मरकझला गेलेल्या अनेक परदेशी तबलिघींबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी मरकझला गेलेल्या 35 जणांविरुद्ध भादंवि, साथरोग नियंत्रण कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मरकझला हजेरी लावून त्यांनी टुरिस्ट व्हिसाचे उल्लंघन केल्याचा आरोपही परदेशी तबलिघींवर ठेवण्यात आला होता. या 35 जणांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईला खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पर्युषण काळात 22 आणि 23 ऑगस्टला मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश तबलिघी जमातचा कार्यक्रम 50 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून आयोजित करण्यात येतो. परदेशी तबलिघींना टुरिस्ट व्हिसाची अनुमती देताना केंद्र सरकारला याची जाणीव होती, असेच गृहित धरावे लागेल. तबलिघींना बळीचा बकरा बनवण्यात आले. भारतातील कोरोना बाधितांची विद्यमान आकडेवारी लक्षात घेता तबलिघी जमातला गेलेल्यांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई अनुचित होती, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा एखादी महामारी किंवा आपत्ती येते तेव्हा राजकीय सरकार बळीचा बकरा शोधण्याचाच प्रयत्न करते. त्यामुळेच बळीचा बकरा बनवण्यासाठी या परदेशी तबलिघींना निवडले गेले असावे, अशी शक्यता आहे. ही परिस्थिती आणि भारतातील कोरोना बाधितांची विद्यमान आकडेवारी लक्षात घेता याचिकाकर्त्यांविरुद्ध कारवाई करायला नको होती. परदेशी तबलिघींविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल संबंधितांनी प्रायश्चित घेण्याची आणि या कारवाईमुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची हीच वेळ आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निझामुद्दीन मरकझला गेलेले अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मीडियातील एका घटकाने या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. तबलिघींना टार्गेट करण्यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅग चालवून मोहिमाही राबवण्यात आल्या होत्या. ज्या तारखांना परदेशी तबलिघींना अटक करण्यात आली, त्या लक्षात घेता हे परदेशी तबलिघी जेव्हा भारतात आले तेव्हा ते कोरोना बाधित नव्हते. ते भारतात आल्यानंतरच त्यांना कोरोनाची बाधा झाली असण्याचीच दाट शक्यता आहे. या परदेशी तबलिघींची विमानतळ सोडण्यासाठी स्क्रिनिंग करण्यात आली होती. केंद्र सरकारने याचिकाकर्त्यांसारख्या व्यक्तींविरुद्ध ते आधीच बाधित असल्याचे गृहित धरून ही कारवाई केली. मात्र ते गृहितक सिद्ध होत नाही. हे तबलिघी ज्या देशातून आले आहेत, त्या देशात कोरोनाचे रूग्ण असल्याचा उल्लेखही आरोपपत्रात नाही. केवळ संशयावरून क्रिमिनल केस चालवली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तबलिगी प्रकरणात 29 परदेशी नागरिकांना दिलासा, औरंगाबाद खंडपीठाकडून गुन्हे मागे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget