एक्स्प्लोर

“हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर...”; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आणखी एक टीझर जारी

उद्या होणाऱ्या सभेची शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु असून, या सभेत उद्धव ठाकरे हे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Uddhav Thackeray Meeting: औरंगाबाद शहरात 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून गेल्या एक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. तर सभेला एक दिवस शिल्लक राहिला असताना शिवसेनेकडून आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. ज्यात पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच 'हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर' अशी हाक शिवसैनिकांना देण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभेची चर्चा होत आहे. ज्या मैदानावर राज यांची सभा पार पडली त्याच मैदानावर उद्धव यांची सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या सभेला सुद्धा महत्व आले असून, या सभेत ते काय बोलणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

आणखी एक टीझर....

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता सभेच्या एक दिवस आधी सुद्धा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचा भाषण दाखवण्यात आला आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर...सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार,भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार,प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार,शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर...असे टीझरमध्ये म्हटल आहे.

शहरभरात होर्डिंग...

उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेनेचे सर्वच स्थानिक नेते कामाला लागले आहे. तर शहरातील सर्वच महत्वाच्या चौकात, जालना रोड आणि सभास्थळाच्या भागात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे लावण्यात आले. त्यामुळे शहर भगवेमय झालं असल्याचं दिसत आहे. सोबतच महिला आघाडी,युवसेना यांच्यासह शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget