![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचं समर्थन करणार नाही, गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानाच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त केले.
![महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचं समर्थन करणार नाही, गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण maharashtra News Beed News Pankaja Munde said she would not support speaking ill of great men महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचं समर्थन करणार नाही, गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/e7f67325fd711aee30648a17d802c872166436496216989_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pankaja Munde: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर त्यांचे दर्शन घेतले. तसेच अर्धा तास त्यांनी मौन बाळगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानाच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त केले. तर महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, महापुरुषांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. त्या काळात त्यांनी कसा संघर्ष पेलला हे पाहण्यासाठी आपण होतो का? असं पंकज मुंडे म्हणाल्यात. तर आज कोणी महापुरुषांबद्दल काही बोलले तर त्याला आपण समर्थन करणार नाही, पण त्याच बोलण्याचीच जणू आपण वाट पाहत आहोत अशा प्रकारचे राजकारण घडत असेल तर ते अंतर्मुख करणारे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
महापुरुषांबद्दल बोलणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यांच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला बोलायचं असते. एखांदा व्यक्ती चांगल्या भावनेने बोलतो. त्यावेळी एखांदा शब्द खालीवर होत असेल आणि त्याचा आपण काहीतरी बोभाटा करतोय तर हे पण महापुरुषांचा अवमान असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात. तर महापुरुषांनी कसा संघर्ष पेलला हे पाहण्यासाठी आपण नव्हतो. त्यामुळे त्यांच्या संघर्षाचा सन्मान करता येत नसेल तर किमान थट्टा देखील करून नका असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
'राजकारणात संयम लागतो, तो आमच्यात आहे'
यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, राजकारणात संयम लागतो, तो आमच्यात आहे. मला लोकं म्हणाले तुम्ही आज काय बोलणार. मुंडे साहेबांचा वाढदिवस आम्ही कधीच मोठा साजरा केला नाही, लोकांनी केला असेल. टाळ वाजवण्यासाठी जर नियम असतील तर देश आणि राज्य चालवण्यासाठी देखील नियम असतात. विरोधकांसाठी नियम आहेत, सत्ताधारांसाठी नियम असून, मिडियासाठी देखील नियम असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
काही लोकं नाराज
मी खरं बोलत असल्याने लोकांना सहन होत नाही. काही लोकं नाराज आहेत. राजकारणातील स्थान खोटे बोलून, नाटकं करून मिळवता येत नाही. राजकरणात जो कुणाला मोठं करू शकतो त्यालाच लोकं सोडतील, जो कोणालाच काही देत नाही त्याला कशाला सोडतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)