Aurangabad: आता जलकुंभावर अधिकाऱ्यांचा पहारा; पाणी प्रश्न मिटता मिटेना
Aurangabad Water Issues: औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे.
![Aurangabad: आता जलकुंभावर अधिकाऱ्यांचा पहारा; पाणी प्रश्न मिटता मिटेना maharashtra News Aurangabad Officer watch on Jalkumbha Aurangabad: आता जलकुंभावर अधिकाऱ्यांचा पहारा; पाणी प्रश्न मिटता मिटेना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/6e6f4b13d934a3bcfadd6f2a06582148_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Water Issues: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न काही मिटताना दिसत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवून सर्वसामन्यांना पाणीपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरातील प्रत्येक जलकुंभावर अधिकाऱ्यांचा पहारा राहणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी शहराच्या पाणीपुरवठ्याचा पुन्हा आढावा घेऊन प्रमुख 31 जलकुंभांवर प्रत्येकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात दंडुका घेऊन शहरातील पाणी प्रश्ना मार्गी लावा असे आदेश केंद्रेकर यांना दिले होते. त्यांनतर केंद्रेकर स्वतः रस्त्यावर उतरून आढावा घेताना दिसत आहे. रोज बैठकावर बैठका सुरु आहे. त्यांनतर आता शहरातील महत्वाच्या 31 जलकुंभावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हे अधिकारी आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत नव्हे तर लाईनमन व पाण्याच्या टाकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून काय तोडगा काढायचा याचा निर्णय घेतील.
पाणी प्रश्न मोदींपर्यंत पोहचला
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसताना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत हा पाणी प्रश्न जाऊन पोहचला आहे. एवढच नाही तर औरंगाबादचा पाणी प्रश्न मोदीच सोडवणार असून, 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारचे कान टोचले आहे. राजभवन इमारतीच्या बंकरमध्ये 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे तसेच जलभूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, औरंगाबादला गेलो होतो, एक दिवस राहिलो. तेथील लोकं येऊन मला भेटले आणि शहरात सात दिवसांनी, पाच दिवसांनी पाणी येत असल्याचे म्हणाले. त्यामुळे पंतप्रधानांनी यात लक्ष घालावे. ‘मोदी है तो मुमकिन है’, म्हणूनच हा प्रश्न नक्की मार्गी लागेल असा मला विश्वास आहे,’ असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)