Shravan Somvar Vrat 2022: मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी
Shravan Somvar Vrat 2022: परळीतील प्रभू वैद्यनाथ, वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहाटेपासूनच पाहायला मिळत आहे.
Shravan Somvar Vrat 2022 : पहिल्या श्रावणी सोमवारला मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परळीतील प्रभू वैद्यनाथ, वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहाटेपासूनच पाहायला मिळत आहे. गेली तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता आले नव्हते, मात्र यावेळी ज्योतिर्लिंग देवस्थानांवर थेट दर्शन होत असल्याने भाविकांमध्येही आनंद पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यात ज्योतिर्लिंग
देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी मराठवड्यात तीन ज्योतिर्लिंग आहेत. ज्यात बीडच्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर आणि हिंगोली येथील औंढा येथील नागनाथ मंदिराचा समावेश आहे. आज पहाटे पासून या तिन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी हजारो भाविकांनी पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्ताने दर्शन घेतले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्ताने मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.काल रात्रीपासूनच भाविक यायला सुरवात झाल्याने पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा वेगवेगळ्या उपयोजना करण्यात आल्या आहे.
औरंगाबादच्या घृष्णेश्वर मंदिरात गर्दी
देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरात आहे. तसेच याची जलधारा पूर्व दिशेला असल्याने पूर्ण प्रदर्शना होते. सोबतच घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगचे पुण्या लाभते अशी भावना असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी रात्रीपासून वेरूळमध्ये दाखल होतांना पाहायला मिळाले.