Sanjay Shirsat: रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता, शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Shirsat: मातोश्रीच्या ऑपरेटर तर किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असल्याच देखील शिरसाट म्हणाले आहेत.
Sanjay Shirsat On Sanjay Raut: एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथ विधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान यावरूनच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी म्हणजेच रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) संजय राऊतांना प्रसाद दिला होता असा दावा शिरसाट यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबत मातोश्रीच्या ऑपरेटर तर किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असल्याच देखील शिरसाट म्हणाले आहेत.
पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती याबाबत ठाकरे कुटुंबातील कोणाला कळाले होते का? या प्रश्नावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, याबाबत उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांना माहिती होती. परंतु परिस्थितीमुळे काहीही बोलता आले नव्हते. मात्र त्यावेळी जे काही घडलं ते सर्व काही आता सांगू शकत नाही, पण संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद दिला होता आणि तो प्रसाद संजय राऊत यांना चांगला माहित आहे. आता पश्चाताप करण्याची वेळ गेली असून, तेही पुढे गेले आणि आम्ही देखील पुढे गेलो असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
अख्ख्या मातोश्रीला याबाबत माहित आहे...
तर पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला यावर आता नंतर भाष्य करू, परंतु याबाबत अख्ख्या मातोश्रीला माहित आहे. ऑपरेटरपासून तर सर्व पीए आणि किचनमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत सर्वांना माहित आहे. पण यावर आता भाष्य करणे योग्य नाही. मात्र एवढ नक्की आहे की, ज्यांच्यावर विश्वास नको पाहिजे होता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला असल्याचं शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांचे उत्तर...
पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती, असे वक्तव्य करणाऱ्या शिरसाट यांना संजय राऊतांनी उत्तर दिले आहेत. "मला बऱ्याच गोष्टी माहिती आहे. संजय शिरसाटांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज नाही. त्यांना काहीच माहित नाही. त्यांना फक्त अर्धी माहिती असून, त्यावर ते चुकीची माहिती देत आहे. मात्र त्या घडमोडीत आम्ही महत्वाच्या भूमिकेत होतो. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडलं हे आम्हाला सर्व माहित असल्याचं," राऊत म्हणाले आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या: