एक्स्प्लोर

नुकसानभरपाई द्या अन्यथा जायकवाडीत जलसमाधी घेऊ, शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी पुन्हा 'ऍक्टीव्ह'

Aurangabad : नुकसानभरपाई न मिळाल्यास जायकवाडी धरणात  जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी (Jayaji Suryavanshi) यांनी दिला आहे.

Aurangabad News: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत पत्र काढले असून, ज्यात वैजापूर आणि पैठण तालुका मदतीपासून वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास जायकवाडी धरणात  जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी (Jayaji Suryavanshi) यांनी दिला आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने पैठणसह औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यावेळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.  दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एकूण 268 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपये वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्र काढले आहे. मात्र यातून पैठण आणि वैजापूर या दोन्ही मतदारसंघाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे पैठण येथील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर याचवेळी राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना यांच्याकडून देखील रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पैठण तालुका औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे. 

शेतकऱ्यांची आज बैठक...

नुकसानभरपाईच्या मदतीच्या यादीत पैठण तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी आज तालुक्यातील शेतकऱ्यांची पैठणच्या जांभूळ बन येथे बैठक होत आहे. यावेळी नुकसानभरपाईसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत असल्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. तसेच पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत शेतकरी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

लवकरच मदत मिळणार: भुमरे 

नुकसानभरपाईच्या मुद्यावर प्रतिक्रिया देतांना पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे काही गैरसमज पसरवण्यात आले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील कोणताही तालुका वगळण्यात आलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा एकूण 95 कोटी 44 लाख रुपयांचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून, लवकरच मदत मिळणार असल्याचे भुमरे म्हणाले. 

जयाजी सूर्यवंशी पुन्हा 'ऍक्टीव्ह'

पुणतांबा येथील शेतकरी संपावरून झालेल्या आरोपानंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी गायब झाले होते. कधीकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणारे जयाजी यांचे आंदोलन देखील होतांना दिसत नव्हते. अधूनमधून आपली भूमिका मांडत असतांना जयाजी यांचे सार्वजनिक आंदोलन बंद झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जयाजी सूर्यवंशी यांनी आंदोलनाची हाक दिली असून, त्यानिमित्ताने जयाजी हे पुन्हा 'ऍक्टीव्ह' झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Embed widget