एक्स्प्लोर

धक्कादायक वास्तव! औरंगाबाद जिल्ह्यातील साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात

Aurangabad: 17 ते 30  नोव्हेंबरदरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती.

Aurangabad News: कोट्यवधी रुपये खर्च करून आणि वेगवेगळ्या योजनांची घोषणा करूनही हजारो बालके कुपोषणाच्या (Malnutrition) फेऱ्यात अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला शून्य कुपोषणाचा स्तर गाठता आलेला नाही. धक्कादायक म्हणजे नुकत्याच झालेल्या तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून आले आहे.

बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा केल्या जातो तसेच अंगणवाडीत दर महिन्याला या बालकांची वजन व उंचीची नोंद घेत, त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबवल्या जातात. ज्यात बालकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोषण ट्रॅकर अॅपद्वारे प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवली जाते. मात्र असे असतांना देखील एका तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

अशी राबवली मोहीम

17 ते 30  नोव्हेंबरदरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. या मोहीमेसाठी 305 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने वेगवेगळ्या अंगणवाडीला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पोषण आहारसोबतच बालकांची तपासणी करण्यात आली. ज्यात  त्यांच्या वजन व उंचीच्या नोंदीही घेण्यात आल्या होत्या. या मोहिमेनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गंभीरपणे तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 1202 बालके, तर मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 6416 बालके आढळून आली आहेत. 

एकूण आकडेवारी...

  • औरंगाबाद तालुक्यात एकूण 1225 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 543 तर  तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 682 बालके आहेत.
  • गंगापूर तालुक्यात एकूण 1413  कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 587  तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 826 बालके आहेत.
  • कन्नड तालुक्यात एकूण 703 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 430 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 273 बालके आहेत.
  • खुलताबाद तालुक्यात एकूण 332 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 78  तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 284 बालके आहेत.
  • पैठण तालुक्यात एकूण 802  कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 371  तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 431 बालके आहेत.
  • फुलंब्री तालुक्यात एकूण 778  कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 90  तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 688 बालके आहेत.
  • सिल्लोड तालुक्यात एकूण 1123 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 787 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 336 बालके आहेत. 
  • सोयगाव तालुक्यात एकूण 641  कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 101 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 540 बालके आहेत. 
  • वैजापूर तालुक्यात एकूण 598 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 126 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 472 बालके आहेत.  

प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कुपोषणाची परिस्थिती पाहता जि.प. महिला व बाल विकास विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. तर तपासणी मोहिमेत आढळलेल्या सॅम आणि मॅम बालकांसाठी 84 दिवसांचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत या बालकांना कुपोषणातून बाहेर काढून सामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी माध्यमांना बोलतांना दिली आहे. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget