(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव; दानवेंनी आरोप फेटाळले
Thirty Thirty Scam: गेल्यावर्षे राज्यभरात गाजेलेल्या तीस-तीस घोटाळ्यात दानवे यांचे नाव समोर येत आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या.
Thirty Thirty Scam: बातमी ठाकरे गटाची चिंता वाढवणारी असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गेल्यावर्षे राज्यभरात गाजेलेल्या तीस-तीस घोटाळ्यात (Thirty Thirty Scam) दानवे यांचे नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची 'ईडी'ने माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे याच घोटाळ्यात अंबादास दानवे यांचे नावाची चर्चा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडल्या होत्या. ज्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे होते. तर याच नावांच्या यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर, दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
माझं नाव नाही : अंबादास दानवे
तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आल्याने आमच्या प्रतिनिधी यांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर 'त्या डायरीत माझं नाव नाही,कोणी दुसरा दानवे असेल.' असा खुलास दानवे यांनी केला आहे.
घोटाळ्यात 'या' लोकांची नावं...
पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत असलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाची यादी 'एबीपी माझ्या'च्या हाती लागली आहे. ज्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावं आहे.
'या' राजकीय नेत्यांची देखील नाव
दानवे यांच्यासह या यादीत आणखी काही नेत्यांची नावं आहेत. ज्यात माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा भानुदास चव्हाण, भाऊसाहेब तरमळे (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष), मनोज पेरे (शिवसेना (ठाकरे गट) पैठण तालुकाध्यक्ष), राजू प्रल्हाद राठोड (शिवसेना पदाधिकारी), विजय अंबादास चव्हाण (राष्ट्रवादी नेते, माजी जिल्हापरिषद सदस्य),चंद्रकांत नामदेवरा राठोड (नगराध्यक्ष सोनपेठ परभणी) यांच्यासह अनेकांची नावं आहेत.
मोठी बातमी! राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची 'ईडी'ने मागवली माहिती