काय सांगता! आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं विभागीय आयुक्तांचा निर्णय
Teachers Exam: यापुढे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे.
Teachers Exam: आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रेकर म्हणाले आहेत. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रकर म्हणाले आहे. त्यामुळे यापुढे आता शिक्षकांना देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
याबाबत बोलतांना केंद्रकर म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यात शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झाला नाही असे आमचं मत आहे. शाळेत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. फार कमी शिक्षक होते की, ते त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतला असल्याचं केंद्रकर म्हणाले.
आठही जिल्ह्यात सर्वेक्षण...
लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. लातूर जिल्ह्याचे सीईओ अभिनव गोयल खूप चांगले काम करतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात देखील असणारच आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं केंद्रकर म्हणाले.
कशा असणार शिक्षकांच्या परीक्षा...
पुढे बोलतांना केंद्रकर म्हणाले की, सद्या आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहे. विज्ञान,गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा अधिक भर असणार आहे. मात्र परीक्षा देणे बंधनकारक नसणार आहे. परंतु शिक्षकांनी या परीक्षा दिल्या पाहिजे असा माझा आग्रह असणार असल्याचे केंद्रकर म्हणाले.
शिक्षकांच्या प्रतिक्रिया...
केंद्रकर यांच्या या निर्णयावर बोलतांना शिक्षक म्हणाले की, केंद्रकर यांच्या निर्णयाचा शिक्षक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत. शिक्षक असो किंवा समाजातील कोणताही घटक असो त्यांनी अपडेट होणे गरजेचे आहे. परंतु शिक्षणाचा दर्जा खालावला याला फक्त शिक्षक मुख्य कारण असल्याचा दावा सत्य नाही. ऑनलाईन अभ्यास आल्यापासून अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मुलांचे वाचण कमी झाले आहेत. अशा अनेक कारणे असले तरीही, केंद्रकर यांच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे शिक्षक म्हणाले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI