जयंत पाटलांचं निलंबन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर; उद्या राज्यभरात निषेध आंदोलन
Jayant Patil ; उद्या राज्यभरात युवक काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जाणार आहे.
Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी अधिवेशनसंपेपर्यंत त्यांचं निलंबन असणार आहे. तर जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे. उद्या राज्यभरात युवक काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्यांचे निलंबन करून हुकूकशाही पद्धतीने सभागृह चालवणाऱ्या विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ उद्या दि.23 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.'
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्यांचे निलंबन करून हुकूकशाही पद्धतीने सभागृह चालवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ उद्या दि.२३ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश(1/1)
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) December 22, 2022
विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलू देत नसल्याचे म्हणत जयंत पाटील संतापले होते. यावेळी बोलतांना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदीय शब्द वापरला होता. त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. तर शिंदे गटासह भाजप आमदारांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सभागृहात सुरु असलेल्या गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. तर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशनसंपेपर्यंत जयंत पाटलांचे निलंबन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी आक्रमक...
पाटील यांच्या निलंबानंतर राष्ट्रवादी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. विरोधीपक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे. जयंत पाटील यांचे निलंबन माघे घ्या असा घोषणा देत पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीचचे आमदार देखील यावरून आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
विधानभवनात विरोधकांकडून आंदोलन...
जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आल्याने विरोधी पक्षातील सर्वच पक्षाचे आमदार आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. विधानभवनाच्या परिसरात विरोधीपक्षातील आमदार यांच्याकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर विरोधीपक्षातील आमदार यांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.
जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात