एक्स्प्लोर

Aurangabad: जलील यांचं शिवसेनेबाबत प्रेम वाढल्याने ते BJP वर टीका करतायत; भाजपचा खोचक टोला

Aurangabad: अंबादास दानवे यांना निवडून आणण्यासाठी एमआयएमने मतदान करून मदत केल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

Aurangabad News: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीतून ज्याप्रमाणे भाजपने (BJP) माघार घेतली आहे, त्याचा एकच अर्थ होतो ते म्हणजे भाजपची फाटली असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून उत्तर देण्यात आला आहे. भाजपचे नेते तथा माजी औरंगाबादचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी जलील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलील यांचे शिवसेनेबाबत प्रेम अधिकच वाढले असल्याने ते भारतीय जनता पार्टीवर टीका करत असल्याचं राठोड यांनी म्हंटले आहे. 

यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना राठोड म्हणाले की, संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त औरंगाबादचे खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी भाजपची फाटली असे जे वक्तव्य केले आहे, ते अतिशय चुकीचे आहे. कारण काही दिवसांपासून जलील यांचे शिवसेनेवरील प्रेम अधिकच वाढलेले असून, हे सर्वानाच माहित आहे. तसेच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवडून आणण्यासाठी एमआयएमने जे मतदान करून मदत केली होती ती संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. 

पुढे बोलतांना राठोड म्हणाले की,  जलील यांची जी शेवटची खासदारकी आहे, ती त्यांनी एन्जॉय करावी. कारण 2024 मध्ये नक्कीच त्यांची फाटणार असून, औरंगाबादच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा भगवा फडकणार आहे. तसेच जलील यांचे शिवसेनेवरील प्रेम सर्वांना दिसत आहे. ज्या भाषेचा वापर जलील करत आहेत ती शिवसेनेची आहे. महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे त्या पद्धतीने भाजप काम करत असल्याने, या सर्वांच्या मनात रुचत आहे. आपली शेवटची खासदारकीची संधी असल्याने निराशापोटी जलील असे विधान करत असल्याचं राठोड म्हणाले आहेत. 

MIM शिवसेनेची बी टीम...

एमआयएमला भाजपची बी टीम म्हणले जातं यावर बोलतांना राठोड म्हणाले की, बी टीम वैगरे बोलणं चुकीचे असून, भाजपची अशी कोणतेही बी टीम नाही. मात्र एमआयएम गेल्या काही दिवसांत काय करत आलंय हे सर्व औरंगाबादकरांना माहित आहे. याचं उदाहरण म्हणजे दानवे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत MIM च्या सर्व नगरसेवकांनी मतदान केले होते. त्यामुळे कुणाचे कुणावर प्रेम आहे आणि MIM कुणाची बी टीम आहे हे आता स्पष्टच असल्याचे सुद्धा राठोड म्हणाले. 

संबंधित बातमी...

Imtiaz Jaleel: तर यामुळे भाजपने निवडणुकीत माघार घेतली, जलील यांनी सांगितले कारण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget