चिंताजनक! लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण; शेतकऱ्यांसमोर नवं संकट
Lumpy Skin Disease: लसीकरण झालेल्या जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे.
![चिंताजनक! लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण; शेतकऱ्यांसमोर नवं संकट maharashtra News Aurangabad News Lumpy infection in animals even after vaccination new crisis in front of farmers चिंताजनक! लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण; शेतकऱ्यांसमोर नवं संकट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/14/84846e0659a209abecca8fef5345c7891663151742772290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता जनावरांचे लसीकरण (Animal Vaccination) केले जात आहे. मात्र लसीकरण केल्यावर सुद्धा जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथील 30 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. यात काही लसीकरण झालेल्या जनावरांचाही समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पशुगणनेच्या आकडेवारीनुसार केन्हाळ्या गावात एकूण 1 हजार 656 जनावरांची संख्या आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून आतापर्यंत केन्हाळ्यासाठी 1 हजार 400 लसींचा पुरवठा झाला आहे. महिनाभरात गावात लम्पीबाधित जनावरांचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. यापैकी 10 जनावरांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे ती बरी झाली आहे. मात्र मंगळवारी गावात पुन्हा नव्याने चार जनावरांना लम्पीची लागण झाली. यातील दोन जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, लसीकरण झालेल्या जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी एस. एस. काकडे म्हणाले की, केहाळा येथील 90 टक्के जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीही लम्पीची लागण होत असल्याचे समोर येत आहे. लसीकरण झाल्यानंतर 21 दिवसांनंतर लम्पीचा धोका टळतो. त्यादरम्यान लागण होऊ शकते, असे काकडे म्हणाले.
जिल्ह्यातील लम्पीची आकडेवारी
तालुका | पशुधन संख्या | झालेले लसीकरण |
औरंगाबाद | 63666 | 64894 |
फुलंब्री | 56533 | 50997 |
सिल्लोड | 71310 | 71250 |
सोयगाव | 23265 | 28200 |
पैठण | 72290 | 67997 |
गंगापूर | 62302 | 52900 |
कन्नड | 86032 | 86000 |
खुलताबाद | 28780 | 28785 |
वैजापूर | 70216 | 67900 |
एकूण | 534394 | 518923 |
महत्वाच्या बातम्या...
काय सांगता! लम्पीच्या अनुषंगाने गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी जनजागृतीची जबाबदारी आता शिक्षकांवर
'लम्पी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार उदासीन, राजू शेट्टी यांची हायकोर्टात याचिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)