Marathwada: वरुणराजा मराठवाड्यात पुन्हा बरसला; पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
Marathwada Rain Update: मराठवाड्यात 41 लाख 43 हजार 478 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
Marathwada Rain Update: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मराठवाड्यात पुन्हा हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद, नांदेडसह इतर जिल्ह्यात सुद्धा कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. विभागात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अपेक्षापेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस...
अ.क्र. | जिल्हा | गेल्या चोवीस तासांतील पाऊस |
1 | औरंगाबाद | 9.02 मिलिमीटर |
2 | जालना | 14.10 मिलिमीटर |
3 | बीड | -- |
4 | लातूर | 29.05 मिलिमीटर |
5 | उस्मानाबाद | 10 मिलिमीटर |
6 | परभणी | 20.10 मिलिमीटर |
7 | हिंगोली | 39.20 मिलिमीटर |
मराठवाड्यात 85 तकी पेरण्या...
जून महिन्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत विभागात 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 86.67 टक्के पेरण्या झाल्या असून,जालना 94.24 टक्के, बीड 8279 टक्के, लातूर 71.54 टक्के, उस्मानाबाद 79.85 टक्के, नांदेड 90.71 टक्के, परभणी 85.46, हिंगोली 91.63 टक्के पेरण्या पूर्णं झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात 41 लाख 43 हजार 478 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जायकवाडीतून पाणी सोडण्याची शक्यता...
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी 76 टक्के झाली आहे. तर अजूनही 29 हजार 859 क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणातून पाणी विसर्ग करण्याची शक्यता असून, याबाबत धरण प्रशासनाने माहिती दिली आहे. तसेच कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, म्हणून गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.