एक्स्प्लोर

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरता सूचना; मंडळाचे शाळांना पत्र

SSC-HSC Exam: याबाबत सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना पत्र पाठवण्यात आले आहे. 

SSC-HSC Exam: बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तर कॉपीमुक्त आणि सुरक्षीतरित्या पपरीक्षा पार पडावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यापूर्वी या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही सूचना देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहण्यापूर्वी देखील विद्यार्थ्यांकरिता 22 महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. याबाबत सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना पत्र पाठवण्यात आले आहे. 

उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरता सूचना 

  • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्या वेळी प्रवेशपत्राची व ओळखपत्राची मागणी करतील त्या प्रत्येक वेळी त्यांना ते दाखविता आले पाहिजे. 
  • परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती पत्रकावर (Form-1) बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी आणि त्यानंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच काळजीपूर्वक चिकटवावा.
  • उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठरावीक रकान्यात बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी.
  • परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यावर व पर्यवेक्षकाकडे जमा करताना ती सुस्थितीत असल्याची व त्यातं सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यावी.
  • उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्र. 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करावा.
  • उतरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये. केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा.
  • प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहावे. उतरपत्रिका किंवा पुरवणी उतरपत्रिकेचे कोणतेही पान फाडू नये. फाडल्यास परीक्षार्थी शिक्षेस पात्र राहील.
  • पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर व पुरवण्यांवर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच उत्तरपत्रिकेसोबत जोडलेल्या पुरवण्याची संख्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर बिनचूक नोंदवावी.
  • प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागावर, प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक क्रमांक नोंदवावा. निर्धारित 10 मिनिटांत प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचन करावे.
  • कच्चे लिखाण करावयाचे झाल्यास ते पेन्सिलनेच आणि उतरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावरच करावे. त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख असावा. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करण्यात येऊ नये.
  • संबंधित सेक्शन, प्रश्न, उपप्रश्नाचे उत्तर जेथून सुरू होते, तेथेच समासात सेक्शन, प्रश्न, उपप्रश्न क्रमांक अचूक व स्पष्ट लिहावा. यासाठी वेगवेगळ्या शाईचा वापर करू नये.
  • एकाच सेक्शनच्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या प्रश्न, उपप्रश्नाकरिता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणू नयेत.
  • परीक्षार्थ्याने उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा त्याला शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्याठिकाणी निळ्या, काळ्या शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये.
  • परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर करावा अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
  • परीक्षार्थ्याविरुध्द खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकेल. ज्यात पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे, शरीरावर, कपड्यावर मजकूर लिहिलेला असणे. तसेच कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे संपर्क साधणे, एकट्याने अथवा सामुदायिक कॉपिंग करणे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी परीक्षा कक्षातून बाहेर नेण्याचा प्रकार. उत्तरपत्रिका, पुरवणी उतरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदीची अदलाबदल करणे, इतरांना देणे-घेणे.  केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे अथवा अन्य गैरप्रकार करणे.
  • उत्तरपत्रिकेत, पुरवणीत प्रक्षोभक, असांविधानिक भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक, फोन नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सुचविणे, विनंती करणे याद्वारे स्वतःची ओळख देणे, विषयाशी संबंधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे (चुकीची उत्तरे वगळून) तसेच कोणत्याही प्रकाराने ओळख देणे (उदा. विशिष्ट खूण करणे, चिन्ह काढणे नांव, पत्ता लिहिणे, शाळेचे, केंद्राचे, गावाचे नांव, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे ओळख पटविणारी बाब) इत्यादी कृती केल्यास अशा परीक्षार्थ्याची चौकशी करून संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात येईल.
  • परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षा संपेपर्यंत परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत परीक्षागृहाबाहेर जावयाचे असल्यास परीक्षार्थ्याने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल, त्यानंतर विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर काळ्या रंगाचा होलोक्राफ्ट स्टिकर सेक्शन प्रत्येकी एक या प्रमाणे दिलेल्या जागेवरच बरोबर चिकटवावा. प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल. अंतिम घंटा होताच उत्तरे लिहिणे थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्या बरोबर बांधल्याची खात्री करावी. त्याचप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्यांची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकाने सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये. 
  • परीक्षर्थ्याच्या प्रवेशपत्राचा, ओळखपत्राचा दुरुपयोग जो कोणी परीक्षा काळात करील त्याचे व संबंधित विद्यार्थ्याचे वर्तन अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. दोन्ही संबंधिताविरुध्द नियमानुसार कारवाई केली जाईल.
  • उत्तरपत्रिकेत स्केचपेनचा वापर करता येणार नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलचा वापर करावा. भाषा विषय कृतिपत्रिकामध्ये आकृत्यांसाठी पेनचा वापर करावा.
  • परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, Pocket Calculator वा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करता येणार नाही.
  • मंडळाने दिलेली अधिकृत लॉग टेबल वापरावे व पेपर संपल्यानंतर परत करावे..

इतर महत्वाच्या बातम्या: 

SSC-HSC Exam: दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget