एक्स्प्लोर

Ganesh Visarjan In Aurangabad: औरंगाबादमध्येही विसर्जन मिरवणूकीला सुरवात, संस्थान गणपतीची मिरवणूक निघाली

Ganesh Visarjan In Aurangabad: शहरात सर्वप्रथम संस्थान गणपती येथून मिरवणुकीला सुरवात होते.

Ganesh Visarjan In Aurangabad: राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पुण्यात मानाचे गणपती  विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. तर औरंगाबादमध्येही आता विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली आहे. सकाळी अकरा वाजता शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरात सर्वप्रथम संस्थान गणपती येथून मिरवणुकीला सुरवात होते. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. यावेळी सुद्धा सर्वच पक्षातील नेत्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळत आहे. 

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेश भक्तांना साद्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र यावेळी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्त बाप्पाच्या निरोपासाठी तयार झाले आहेत. औरंगाबादचा मानाचा गणपती असलेल्या संस्थान गणपतीची मिरवणूक निघाली आहे. त्यामुळे आता या मिरवणूकीनंतर इतर गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याप्रमाणे औरंगाबाद शहरात सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ज्यात  पोलीस आयुक्त 01, पोलीस उपायुक्त 04, सहायक आयुक्त 06 , पोलीस निरीक्षक 40, सपोनि, उपनिरीक्षक 136, पोलीस अंमलदार 2238, महिला अंमलदार 314 यांचा समावेश असणार आहे.  तसेच शहरभरात पोलिसांचे पथक गस्तीवर सुद्धा असणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार विसर्जन...

औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाने विसर्जनाची तयारी केली आहे. ज्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावर असलेल्या विहिरीचे सुद्धा समावेश आहे. यासाठी प्रशासनाने विहिरीची रंगरंगोटी केली आहे. तर त्याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. 

नेत्यांनी धरला ठेका...

संस्थान गणपतीच्या मिरवणूकीत सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहे. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळाला. आता मिरवणूक विसर्जनाच्या दिशेने निघाली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad: पोलिसांनी डीजे विरोधात खातं उघडलं; मिरवणुकीपूर्वीच दोन डीजे घेतले ताब्यात

Aurangabad: गणेश विसर्जनावेळी औरंगाबाद शहारतील 'हे' मार्ग राहणार बंद; वाहतूक पोलिसांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget