Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यात वर्षभरात तब्बल 997 शेतकऱ्यांनी संपवले जीवन; बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
Marathwada Farmer Suicide: विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात (Beed District) सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Marathwada Farmer Suicide: मराठवाड्याला (Marathwada) पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात कृषिमंत्री (Agriculture Minister) पद मिळाले असल्याचे एकीकडे चित्र असतानाच, दुसरीकडे मराठवाड्यात वर्षभरात तब्बल 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करत आपले जीवन संपवलं असल्याची आकडेवारी समोर आली आहे. कधी अत्यल्प पाऊस, कधी अतिवृष्टी (Heavy Rain) तर कधी अवकाळी पावसाच्या तडाख्यात मराठवाड्यातील शेतकरी (Farmers) नेहमीच संकटात सापडला आहे. दरम्यान अशाच संकटाचा सामना करतांना हतबल होऊन मराठवाड्यातील तब्बल 997 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात (Beed District) सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आधी दुष्काळ आणि गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेदिवस वाढत असल्याने तो आर्थिक संकटातून बाहेर पडत नाही. कर्ज कसे फेडणार, या विवंचनेतून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. तर मराठवाड्यात यावर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या धक्कादायक आणि डोके सुन्न करणारी आहे. जानेवारी ते 22 डिसेंबर 2022 या कालावधीत 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सर्वाधिक 123 आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या असून, एकूण आत्महत्यांमध्ये सर्वाधिक 268 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या आकडेवारी!
जिल्हा | आत्महत्या प्रकरणे |
औरंगाबाद | 173 |
जालना | 117 |
परभणी | 73 |
हिंगोली | 44 |
नांदेड | 147 |
लातूर | 61 |
उस्मानाबाद | 114 |
एकूण | 997 |
756 आत्महत्याग्रस्तांच्या नातेवाइकांना मदत वाटप
मराठवाड्यात वर्षेभरात 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यापैकी 132 प्रकरणे ही विविध कारणांमुळे अपात्र ठरली आहेत. तर 94 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. तर आतापर्यंत 756 आत्महत्याग्रस्तांच्या नातेवाइकांना मदत वाटप करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातील बहुतांश प्रकरणे प्रलंबित असल्याचे देखील समोर आले आहे.
Farmer Suicide News : कापसाच्या दरात घसरण, पैठण तालुक्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या