एक्स्प्लोर

कापसाला पहिल्याच दिवशी मिळाला अकरा हजारांचा भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Cotton Sale: विजया दशमीच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Aurangabad News: ग्रामीण भागात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात येतो. त्यामुळे यावेळी नेमकं काय भाव जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र यावेळी दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात कापसाची मोठी बाजारपेठ असून, दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजया दशमीच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

पैठण तालुक्यात साडेसात हजारांचा भाव.. 

सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड येथे बुधवारी सकाळी वजन काट्याचे विधिवत पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला. सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात या भागात 10  हजाराहून अधिक भाव कपाशीला मिळाला होता. 

आवक घटणार... 

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांची वाढ खुटली आहे. तर काही ठिकाणी पिकं पिवळी पडली असल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे. आवक जर घटली तर निश्चीतच कापसाला भाव चांगला मिळू शकतो. मात्र भाव मिळाला तरी पिक घटल्याने शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. 

ओल्या कापसाला भाव कमीच...

यावर्षी मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. तर कापूस वेचणीला आला असताना देखील पावसाची रिपरिप अनेक भागात सुरूच आहे. त्यामुळे कापूस पुर्णपणे ओलसर झाला आहे. विशेष म्हणजे प्रतवारी पाहून कापसाला भाव देण्यात येतो. कापूस ओला असल्यास त्याचे वजन जास्त भरतो, मात्र भाव कमी मिळतो. प्रथमिक माहितीनुसार पहिल्या वेचणीतील कापूस वजन करत असून, ओलाही आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Maharashtra Rain : नांदेडसह परभणीला जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शेती पिकं मातीमोल होण्याची शक्यता, शेतकरी संकटात

Dhiraj Deshmukh : सरकार शेतकऱ्यांना 'गोगलगायी'च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊतChandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही,  मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाहीMahavikas Aghadi Garuntee : मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे असतील? राहुल गांधी घोषणा करणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Baba Siddique Case: मोठी बातमी: लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन
लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन, 5 कोटींची मागणी
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Embed widget