Aurangabad: मुख्यमंत्र्यांचा ताफा चहासाठी हॉटेलवर थांबला; शिंदेंना पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
Aurangabad News: मुख्यमंत्र्यांचं चहा नाश्ता करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Aurangabad News: विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर सोमवारी बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चारचाकीने बीडकडे परतणारे मुख्यमंत्री शिंदे यांनी चहा पिण्यासाठी आपला ताफा एका हॉटेलसमोर थांबवला. त्यामुळे मुख्यमंत्री यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चहाप्रेम अनेकदा पाहायला मिळाले. अचानक आपला ताफा रस्त्याच्या कड्याला थांबवून चहावर ताव मारणारे मुख्यमंत्री शिंदे अनेकदा पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील चहाप्रेमी पाहायला मिळाले आहे. विनायक मेटे यांच्या अंत्यविधीहून औरंगाबदकडे परतताना पाचोड येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा चहा-नाश्त्यासाठी अचानक थांबला. सोबतच रोहयो मंत्री संदिपान भुमरे सुद्धा होते.
गावाकऱ्यांची हॉटेलजवळ गर्दी
एका रस्त्यावरील हॉटेल समोर चक्क मुख्यमंत्री यांचा ताफा थांबल्याने नेमकं काय झाले हे सुरवातीला कुणाला कळेना. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी हॉटेलमध्ये चहा-नाश्त्यासाठी ताफा थांबवल्याचे समोर आले. मुख्यमंत्री हॉटेलमध्ये चहा घेत असल्याचे कळताच गावाकऱ्यांनी हॉटेल जवळ मोठी गर्दी केली होती. तर मुख्यमंत्र्यांचं चहा नाश्ता करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यापूर्वी थांबवला होता ताफा...
यापूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आले असतांना सिल्लोड येथून शहरात परततांना मुख्यमंत्री शिंदे यांनी चहा पिण्यासाठी फुलंब्रीत ताफा थांबवला होता. यावेळी सुद्धा त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये चहाचा आस्वाद घेतला होता. त्यांच्या याच साधेपणाची मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा शिंदे यांचा साधेपणा औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला.
महत्वाच्या बातम्या...
Abdul Sattar: आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा
Aurangabad: रस्सीखेच! भुमरे ध्वजवंदनापुरतेच; मीही पालकमंत्री होऊ शकतो, शिरसाटांनंतर सत्तारांचा दावा