Aurangabad: चादर-बेडशीट विकायला आले अन् मंगळसूत्र हिसकावून गेले; सहा तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Crime News: आठ तासात तीन मंगळसूत्र चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.
Aurangabad Crime News: आठ तासात दोन मंगळसूत्र चोरीच्या घटनेने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. मात्र औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या काही तासात आरोपींना मोठ्या शितापीने बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर फिरून गल्लीबोळात चादरी-बेडशीट विकणारेच मंगळसूत्र चोर निघाले. याप्रकरणी पोलिसांनी जसपालसिंग बहादूरसिंग भाटिया (30), चंदनसिंग संतोषसिंग दुधानी (25) यांना अटक केली आहे.
अशा घडल्या घटना...
पहिल्या घटनेमध्ये उस्मानपुरा भागातील भाजीवाली पुतळ्याजवळ विमल नंदकुमार ढगे या रिक्षामध्ये बसून आपल्या घराकडे जात असताना ब्रेकर आल्याने रिक्षाचालकाने वेग कमी केला. त्याचवेळी चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन विमल यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत लंपास केली. ही फिल्मी स्टाईल चोरी उलटून आठ तास होतच नाही तोच, नागेश्वरवाडी पुन्हा एक मंगळसूत्र चोरीची घटना समोर आली. रेखा विजयराव नाईक या आपल्या नागेश्वरवाडी येथील घरातून दही आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तोच चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवली. विशेष म्हणजे या दोन्ही घटनेतील आरोपी एकच होते. तर तिसरी घटना पुंडलीकनगर हद्दीत घडली होती, मात्र त्यात गुन्हा दाखल नव्हता.
असे अडकले चोरटे...
या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरु असतानाच पथकाने एका लॉजवर सहज विचारणा केली. आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज लॉज व्यवस्थापकाला दाखवले असता दहा मिनिटांपूर्वीच हॉटेल सोडून गेल्याची त्याने माहिती दिली. त्यामुळे आरोपींनी हॉटेलमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींच्या दौलताबादजवळ मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून तीन मंगळसूत्रसहित 3 लाख 21 हजार हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संबंधित बातम्या
चित्तथरारक! पुढे चोर मागे पोलीस, अचानक चोरट्यांचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट...
Crime: चक्क सुपारी घेऊन चोरायचे दुचाकी; चोरट्यांचा नवीन फंडा पाहून पोलीसही चक्रावले