Aditya Thackeray: पुन्हा त्याच गावात आदित्य ठाकरेंची आज तोफ धडाडणार; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येत आहे.
Aaditya Thackeray In Aurangabad: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांच्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घातल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येत आहे. मात्र आज देखील आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.
आदित्य ठाकरे यांची औरंगाबादच्या बिडकीन गावात सभा होणार आहे. औरंगाबाद पैठण रस्त्यावर असलेल्या या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा पार पडणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंचा या बिडकीन गावात हा तिसरा दौरा आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी त्या गावात ज्याठिकाणी रॅली काढली होती, त्याच ठिकाणी काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली होती. त्यामुळे या गावाची मोठी चर्चा झाली होती. आता आज पुन्हा याच गावात आदित्य ठाकरे यांचे भाषण होणार आहे.
याच गावात शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं होते
आदित्य ठाकरे यांचा या गावात दौरा झाल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य यांनी काढलेल्या ठिकाणी रॅली काढली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची रॅली संपताच ठाकरे गटाचे नेते मनोज पेरे यांच्यासह शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे हे ज्या रस्त्याने गेले त्याठिकाणी गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा देखील बिडकीन गावातील दौरा चांगलाच गाजला होता. आता त्याच गावात आज पुन्हा आदित्य ठाकरे येणार आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त!
आदित्य ठाकरे यांच्या महालगावातील कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून पोलीस सुरक्षेत कसूर झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर तत्काळ आदित्य ठाकरे यांच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी यापुढे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. तर आज बिडकीन गावात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी देखील असाच काही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्तापासूनच छावणीचे स्वरूप आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News: मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा मोठा दावा