एक्स्प्लोर

14 December: औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात आज दिवसभरात काय घडलं, पाहा एका क्लिकवर

Aurangabad Today News: आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी थोडक्यात...

Today Aurangabad News Update: औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 डिसेंबर रोजी दिवसभरात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीचा आढावा आपण घेणार आहोत. वाळूज भागात झालेला गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा ठाकरे गटात झालेला प्रवेश यासह आणखी काही महत्वाच्या बातम्या पाहा थोडक्यात... 

  • वाळूजला गोळीबार... 

औरंगाबाद-अहमदनगर (Aurangabad-Ahmednagar) महामार्गावर हिवाळी कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकान थाटणाऱ्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री 11: 35 वाजेच्या सुमारास या व्यापाऱ्यांना धमकावत गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ घडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.याबाबत माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: औरंगाबादमध्ये कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार

  • रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे...

स्कूलबस शाळेच्या मागे उभी करून चालक चहा पिण्याच्या बहाण्याने बस सोडून जायचा आणि त्याचवेळी एक रिक्षाचालक (Rickshaw Driver) स्कूलबसमध्ये (School Bus) घुसायचा घुसून आठ व नऊ वर्षीय तीन शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. घाबरलेल्या मुलींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत सापळा रचून अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला रंगेहात पकडले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: संतापजनक! स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप

  • औरंगाबादेत 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन...

शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ज्यात आतापर्यंत या सर्वेक्षणात शहरात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर अनधिकृत नळ कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: अबब ! औरंगाबादेत 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन, महापालिकेच्या सर्वेक्षणातून आली माहिती समोर

  • माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर शिवसेनेत

वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर (Bhausaheb Chikatgaonkar) यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. चिकटगावकर यांचा आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चिकटगावकर पक्षात नाराज होते आणि याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे खुलासा देखील केला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का', घड्याळ सोडून 'हा' माजी आमदार घेणार हाती मशाल

  • थेट समृद्धी महामार्गावर केली फायरिंग

समृद्धी महामार्गावर उभा राहून बंदुकीतून फायरिंग करतानाचा एका तरुणाचा व्हिडिओ (Video) समोर आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबादजवळ असलेल्या सम्रुद्धी महामार्गावरील बोगद्या समोर उभं राहून एका तरुणाने बंदुकीतून फायरिंग केल्याचा हा व्हिडिओ  आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाळु गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: Video: 'रॉकी भाईची हवा...' थेट समृद्धी महामार्गावर केली फायरिंग, व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Embed widget