Aurangabad: न्यायालयाचा काय निकाल येणार म्हणून शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय: खैरे
Aurangabad News: आधी न्यायालयाच काय ते होऊ द्या मंत्रीमंडळाच नंतर पाहू असे यांना वरूनच सांगितले जात असावे, असेही खैरे म्हणाले.
Aurangabad News; राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून, याकडे संपर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या की उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तत्पूर्वी या सुनावणीवर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल, काय नाही होणार यामुळे शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेले असल्याचं खैरे म्हणाले आहे.
काय म्हणाले खैरे...
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, सरकारमध्ये सद्या मंत्री कुणीच नसल्याने सगळी कामे पेंडीग पडली असल्याचं नागरिक म्हणतायत. अशावेळी सचिवांना अधिकार असतात. आठ तारखेला न्यायालयात काय होईल यामुळे शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे आधी न्यायालयाच काय ते होऊ द्या मंत्रीमंडळाच नंतर पाहू असे सांगितले जात असावे. तसेच अशाच काही सूचना भाजपकडून वरून आल्या असल्याचं मला वाटतंय, असे खैरे म्हणाले. तर सुप्रीम कोर्टात काय होईल याची यांना धाकधूक आहे. त्यामुळेच याला हे मंत्रिपद मिळण्याची शक्यता, ही यादी ती यादी असे उगाच काहीतरी सोडायचं सद्या सुरु असल्याच खैरे म्हणाले.
ईडीकडून त्रास दिला जातोय...
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मी दुखी झालो आहे. अर्जन खोतकर म्हणाले की, माझ्या पत्नीची चौकशी वैगरे केली. पण राऊत यांच्या पत्नींना तर चौकशीसाठी ईडीने बोलावलं, त्यामुळे खोतकर यांनी हे उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे. शिंदेंच्या सोबत गेल्याने त्यांची चौकशी थांबवणार नाही. तर एक कोटी आणि पन्नास लाखासाठी एवढा त्रास ईडीकडून दिला जात असल्याचं खैरे म्हणाले.
दिल्लीत सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार...
दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या, राहुल गांधी सोनिया गांधी म्हणाले आहे की, आम्ही यांना घाबरणार नाही. तुम्ही ज्यांना जास्त त्रास दिला ते तुमच्यावर उलटतात. त्यामुळे जनता आपला बदला घेईल. इंदिरा गाधींच्या काळात काय झालं होते. दुसरं सरकार आले होते, हे यांनी समजून घेतलं पाहिजे, असेही खैरे म्हणाले.