एक्स्प्लोर

औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी, शेतकऱ्यांची मात्र पैसे भरूनही वीज खंडित

Aurangabad : रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या नावावर 1 लाख 31 हजार 160 रुपयांची विजेची थकबाकी आहे. 

Maharashtra Political Light Bill: कृषिपंपधारकांकडे थकीत असलेल्या बिलांसाठी राज्यभरात महावितरणच्या वतीने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान पैठण तालुक्यातील 4  हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील 3 हजार 716 शेतकऱ्यांनी थकीत बिल भरणा केला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे पैठणचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या नावावर 1 लाख 31 हजार 160 रुपयांची विजेची थकबाकी आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून, खरीप हातून गेला आहे. दरम्यान आता रब्बीच्या हंगामात तरी मागील भरपाई भरून निघेल अशी उम्मीद घेऊन शेतकरी कामा ला लागला आहे. मात्र आधी अस्मानी आता महावितरणाच्या सुलतानी संकटाने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. वीज बिल थकीत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन बंद केली जात आहे. मात्र दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांकडे लाखोंची थकबाकी असतांना देखील त्यांना दिलासा दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची वीज कनेक्शन बंद करण्यात आली असतांना, औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मुलाकडे मात्र 1 लाख 31 हजार 160 रुपयांची विजेची थकबाकी आहे. 

भुमरेंच्या मतदारसंघात शेतकऱ्यांची वीज खंडीत...

संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात देखील वीजबिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन खंडीत करण्यात येत आहे. पैठण तालुक्यातील 4  हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडण्यात आली आहे. मात्र त्याच पैठण तालुक्यात भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांची पाचोड येथील गट नंबर 276 मध्ये  ग्राहक क्रमांक 493260467413 चे वीज मीटर असून, त्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1 लाख 31 हजार 160 रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे दहा-वीस हजारांसाठी शेतकऱ्यांची वीज बंद केली जात असतांना, मंत्र्यांच्या मुलावर लाखो रुपयांची थकबाकी असतांना आता त्यांचे वीज कनेक्शन महावितरण बंद करणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

इतर नेत्यांच्या थकबाकीची यादी...( खाली दिलेली संपूर्ण यादी महावितरण दप्तरी असलेली आहे. यातील सर्व उल्लेख महावितरणाच्या दप्तरी असून, तेच इथे उल्लेख करण्यात आला आहे.)

पृथ्वीराज पद्मसिंग पाटील (उस्मानाबाद) 
ग्राहक क्रमांक: 590140077625
थकीत रक्कम: 2 लाख 23 हजार 900

योगेश भारतभूषण क्षीरसागर (बीड नगराध्यक्ष भरत भूषण शिरसागर यांचे चिरंजीव)
ग्राहक क्रमांक: 576130312721
थकीत रक्कम: 1 लाख 45 हजार 660

बबनराव दत्ताराव यादव-लोणीकर ( भाजप आमदार)
ग्राहक क्रमांक: 524220001520
थकीत रक्कम  84 हजार 730

प्राजक्ता सुरेश धस (आमदार धस यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 572980031334
थकीत रक्कम: 44 हजार 460 

संदिप रविंद्र क्षीरसागर ( राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 576130302458
थकीत रक्कम: 1 लाख 2 हजार 160 

धनंजय पंडितराव मुंडे (राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 586480349169
थकीत रक्कम: 60 हजार 130

प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे (भाजप खासदार)
ग्राहक क्रमांक: 585130006807
थकीत रक्कम: 72 हजार 610

मुंदडा अक्षय नंदकिशोर
ग्राहक क्रमांक : 582560464869
थकीत रक्कम : 1 लाख 64 हजार 980

मधुसूदन माणिकराव केंद्रे( गंगाखेड माजी आमदार)
ग्राहक क्रमांक: 536620069636
थकीत रक्कम: 85 हजार 670
मागील महिन्याचं बील: 

भीमराव आनंदराव धोंडे (माजी आमदार भाजप )
ग्राहक क्रमांक: 573180001140
थकीत रक्कम: 1 लाख 57 हजार 420

शिवाजीराव पंडित ( माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वडील)
ग्राहक क्रमांक: 576010059576
थकीत रक्कम: 1 लाख 13 हजार 960

विलास संदीपन भुमरे ( औरंगाबाद पालक मंत्री भुमरे यांचे पुत्र)
ग्राहक क्रमांक: 493260467413
थकीत रक्कम: 1 लाख 31 हजार 160

मंगलाबाई प्रकाशराव सोळंके (आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 585180002292
थकीत रक्कम: 1 लाख 63 हजार 270

वीज बिल थकलं की शेतकऱ्यांचं कनेक्शन कट मात्र नेत्यांकडे लाखोंची थकबाकी; आकडे पाहून थक्क व्हाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Embed widget