एक्स्प्लोर

वीज बिल थकलं की शेतकऱ्यांचं कनेक्शन कट मात्र नेत्यांकडे लाखोंची थकबाकी; आकडे पाहून थक्क व्हाल

मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असताना देखील त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. 

Maharashtra News:  ऐन रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिल न भरल्याने शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहेत. तर ही कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणे अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अशातच मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असताना देखील त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं, त्यामुळे खरिपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेलं आहे. त्यातून सावरत किमान रब्बी मधून तरी काहीतरी हातात येईल या अपेक्षेने शेतकरी शेतात राबतोय. मात्र आधी अस्मानी संकट आणि आता महावितरणाच्या सुलतानी संकटाचा शेतकऱ्याला सामना करावा लागतो, थकीत वीज बिल भरलं नाही म्हणून कृषी पंपाचे कनेक्शन खंडित केले जात आहे. कारवाई टाळण्यासाठी किमान एक बिल तरी भरावंच लागेल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. एकीकडे शेतकऱ्यांवर अशा प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यातील शेकडो राजकीय नेत्यांचे कोट्यावधींची थकबाकी असताना सुद्धा कोणतीही कारवाई होत नाहीये, या राजकीय नेत्यांची थकीत वीज बिल पाहून तुमचेही डोळे फिरतील. 

पुढील माहिती आम्ही जी देत आहोत ते महावितरणच्या दप्तरी असलेली आहे. महावितरणच्या दप्तरी हेच यांच्याकडे आम्ही जी आकडे देत आहोत तेवढे थकीत आहेत

पृथ्वीराज पद्मसिंग पाटील (उस्मानाबाद) 
ग्राहक क्रमांक: 590140077625
थकीत रक्कम: 2 लाख 23 हजार 900
मागील महिन्याचं बील: 

योगेश भारतभूषण क्षीरसागर (बीड नगराध्यक्ष भरत भूषण शिरसागर यांचे चिरंजीव)
ग्राहक क्रमांक: 576130312721
थकीत रक्कम 1 लाख 45 हजार 660
मागील महिन्याचं बील: 

बबनराव दत्ताराव यादव-लोणीकर ( भाजप आमदार)
ग्राहक क्रमांक: 524220001520
थकीत रक्कम  84 हजार 730
मागील महिन्याचं बील: 

प्राजक्ता सुरेश धस (आमदार धस यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 572980031334
थकीत रक्कम: 44 हजार 460 
मागील महिन्याचं बील: 

संदिप रविंद्र क्षीरसागर ( राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 576130302458
थकीत रक्कम: 1 लाख 2 हजार 160 
मागील महिन्याचं बील: 

धनंजय पंडितराव मुंडे (राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 586480349169
थकीत रक्कम: 60 हजार 130
मागील महिन्याचं बील: 

प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे (भाजप खासदार)
ग्राहक क्रमांक: 585130006807
थकीत रक्कम : 72 हजार 610
मागील महिन्याचं बील: 

मुंदडा अक्षय नंदकिशोर
ग्राहक क्रमांक : 582560464869
थकीत रक्कम : 1 लाख 64 हजार 980
मागील महिन्याचं बील: 

मधुसूदन माणिकराव केंद्रे( गंगाखेड माजी आमदार)
ग्राहक क्रमांक: 536620069636
थकीत रक्कम: 85 हजार 670
मागील महिन्याचं बील: 

भीमराव आनंदराव धोंडे (माजी आमदार भाजप )
ग्राहक क्रमांक: 573180001140
थकीत रक्कम : 1 लाख 57 हजार 420
मागील महिन्याचं बील: 

शिवाजीराव पंडित ( माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वडील)
ग्राहक क्रमांक: 576010059576
थकीत रक्कम : 1 लाख 13 हजार 960
मागील महिन्याचं बील: 

विलास संदीपन भुमरे ( औरंगाबाद पालक मंत्री भुमरे यांचे पुत्र)
ग्राहक क्रमांक: 493260467413
थकीत रक्कम: 1 लाख 31 हजार 160

मंगलाबाई प्रकाशराव सोळंके (आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 585180002292
थकीत रक्कम : 1 लाख 63 हजार 270

अनेकांकडे मीटर नाही

मराठवाड्यात एवढेच नेते आहेत का ज्यांचं वीज बिल थकीत आहे, एवढेच नाही तर अनेक नेतेमंडळी आहेत, मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे 50 ते 100 एकर जमीन असून देखील अनेकांकडे मीटर दिसत नाही. त्यामुळे एकत्र ते जनरेटर वापरत असावे अन्यथा देशी जुगाडचा वापर करत असावे.

मराठवाड्यातील अनेक नेत्यांची नावावर जमिनी आहेत, सातबाऱ्यावर नावं देखील आहे मात्र वीजबिल दुसऱ्याच नावावर येते. अनेक शेतकऱ्यांकडे कृषी महामंडळाची जमीन आहे कृषी महामंडळाच्या नावावर आहे त्या बिलाचं काय होतं हे आतापर्यंत समजलं नाही.

थकीत वीज बिल न भरल्याने सामान्य शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्याने पीक सुकू लागली आहे, मात्र दुसरीकडे लाखोंचं वीज बिल थकूनही नेत्यांची फळबागे फुलली आहे.

काय म्हणाले नेते
याबाबत विचारलं असता धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की,  मालनाथपुर येथील शेती 2016-17 साली विकली असून, महावितरणचा ग्राहक क्रमांक: 586480349169 यावर थकीत रक्कम 60 हजार 130 दाखवत आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सदर मीटर वरील सर्व बाकी निल करून सदर कनेक्शन पर्मनंटली डिस्कनेक्ट करण्यासाठी अर्ज दिलेला आहे, असं मुंडेंनी म्हटलं आहे.   या मीटर बाबत दाखवण्यात आलेली शेतजमीन माझ्या मालकीची नसून तिथे सदर ग्राहक क्रमांकाचे मीटर किंवा कोणताही वापर अस्तित्वात नाही. त्यामुळे कुठलीही थकबाकी असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं  धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

तर खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे की, थकित बिल महावितरणकडून पाठवण्यात आलं नव्हतं. बिलाची माहिती मी आज घेतली, बिल पूर्ण भरलं आहे, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. 

बबनराव लोणीकर म्हणाले की, मी सर्व बिल भरलेले आहेत माझ्याकडे कुठलेही बिल नाही. कोणत्या नेत्याकडे बाकी आहे याची  मला माहित नाही. तसेच तुम्ही माझ्याकडे बिल असल्याची माहिती कुठून आणली हे मलाही माहिती नाही. पण माझ्याकडे कुठलीही थकबाकी नाही, असं बबनराव लोणीकरांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget