(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: 'जिथे पैसे तिथे औरंगाबादचे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
Politics: मी आकडेवारीनुसार दाखवून देईल की, हा पैशाचा खेळ कसा चालतो असेही जलील म्हणाले.
Shiv Sena Politics: राज्याच्या राजकारणात प्रत्येक क्षणाक्षणाला नवनवीन घडामोड घडतांना पाहायला मिळत आहे. शिवसेनेत निर्माण झालेल्या गटबाजीची देशभरात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा अधिक आमदार आपल्यासोबत नेले आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. दरम्यान यावरूनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधील शिवसेना आमदारांवर निशाणा साधला आहे. औरंगाबादच्या आमदारांना फक्त पैसे पाहिजे, जे त्यांना पैसे देतील त्यांचे मागे ते पळतील अशी जहरी टीका, जलील यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना जलील म्हणाले की, आमच्या औरंगाबादमधील सर्वच आमदार गेले. त्यात दोन मंत्र्यांचे सुद्धा समावेश आहे. तुम्हाला मंत्री केले, त्यांनतर तुम्हाला अजून काय पाहिजे होते. त्यामुळे हिंदुत्ववाच्या फक्त गप्पा मारल्या जातात, त्यांना हिंदुत्ववाशी काहीही देणघेण नाही. हा सगळा पैशाचा धंदा आहे. जे त्यांना पैसे देतील त्यांच्याकडे हे लोकं पळतील. मी आकडेवारीनुसार दाखवून देईल की हा पैशाचा खेळ कसा आहे,असेही जलील म्हणाले.
शिवसेनेचं प्लॅन तर नाही ना?
एवढ्या मोठ्या आमदारांना बळजबरीने घेऊन जाणे शक्य नाही. मोठ्या संख्येने आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जातात आणि याची सरकारला भनक सुद्धा लागत नाही. विशेष म्हणजे त्यांना पोलीस बंदोबस्त सुद्धा मिळाले. त्यामुळे हे सर्व काही शिवसेनेनेच तर नाही केलं ना अशीही चर्चा असल्याच जलील म्हणाले.
मराठवाड्यातील आठ आमदार...
शिंदेंच्या यांच्या बंडात 'मराठवाड्या'च्या मोठा वाटा आहे. कारण एकट्या मराठवाड्यातील शिवसेनेच्या 12 आमदारांपैकी 8 आमदार शिंदेंच्या सोबत आहे. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरनारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर या आठ आमदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील, कळमनुरीचे संजय बांगर, कन्नडचे उदयसिंग राजपूत हे केवळ चार आमदार अजूनही शिवसेनेसोबतच असून मुंबईतील बैठकींना उपस्थित होते.