एक्स्प्लोर

Crime Story: दिराचे झाले वहिनीवर प्रेम, पैश्यांची मागणी होताच केला तिचा गेम; औरंगाबादेतील घटना

Aurangabad Crime News: महिलेच्या दिरानेच आपल्या वहिनीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

Aurangabad Crime News: वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे सोमवारी सायंकाळी राहत्या घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पती व सासुला ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, महिलेच्या दिरानेच तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबध निर्माण झाले आणि यातून महिलेकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिराने दिली आहे. माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे. 

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर आपल्या जावयाने आणि तिच्या आईनेच ही हत्या केली असल्याची माहिती माया यांच्या आईने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत, मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते. तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास करत होते. 

पोलीस माया यांच्या हत्येचा तपास करत असतानाच त्यांना खबऱ्याकडून एक माहिती मिळाली आणि  पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली. दरम्यान मृत माया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन, पोलीसा ठाण्यात आणले. 

खाक्या दाखवताच खुनाची कबुली...

पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी ज्ञानेश्वरची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या आणि ज्ञानेश्वर पोपटावानी बोलायला लागला. मायाचा खून आपणच केला असल्याची कबुली देखील त्याने दिली. आधी गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पाण्याची टाकीत फेकून दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. 

पैश्यांची मागणी होत असल्याने घेतला जीव...

ज्ञानेश्वर नात्याने मायाचा चुलत दीर लागतो. त्यामुळे एकमेकांच्या घरात दोघांचे नेहमी येणेजाणे असायचे. यादरम्यान चार महिन्यापूर्वी दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबध निर्माण झाले. पण पुढे मायाकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने ज्ञानेश्वर त्रस्त झाला होता. तर पैसे दिले नाहीतर बलात्काराचा आरोप करून समाजात बदनाम करण्याची धमकी देखील मायाकडून मिळत होती. दरम्यान सोमवारी 19 डिसेंबरला मायाने पुन्हा 20 हजारांची मागणी केली. पण पैसे नसल्याचे सांगून, देखील माया समजून घेत नव्हती. तसेच पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत असल्याने ज्ञानेश्वरने तिचा गळा आवळून हत्या केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAvinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget