![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'सामंतां'च्या नावाने फसवणुकीचा 'उद्योग'; नोकरीचे आमिष दाखवून महिलेने 20 लाख उकळले
Aurangabad News: या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
!['सामंतां'च्या नावाने फसवणुकीचा 'उद्योग'; नोकरीचे आमिष दाखवून महिलेने 20 लाख उकळले maharashtra News Aurangabad Crime News The woman extorted 20 lakhs in the name of Industries Minister Uday Samant by pretending to be the lure of a job 'सामंतां'च्या नावाने फसवणुकीचा 'उद्योग'; नोकरीचे आमिष दाखवून महिलेने 20 लाख उकळले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/d6fe8a0a4d0ff50480e303ffe5af09c71669116064692290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या नावाने एका महिलेने नोकरी (Job) लावून देण्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये उकळल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगा पाहतो अशी थाप मारून या महिलेने एका दाम्पत्याकडून भाच्याला नोकरी लावण्यासाठी 20 लाख रुपये उकळले. धक्कादायक म्हणजे उर्वरित रकम व नोकरीचा करारनामा बॉण्डवर लिहून दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिलेच्या विरोधात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सुरेखा विवेक काटे (वय 53 , रा. दशमेशनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी महिला सुरेखाने 16 सप्टेंबर रोजी दीपाली संदीप कुलकणी व संदीप कमलाकर कुलकणी या दाम्पत्याच्या भाच्यास उद्योग विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. आपला मुलगा केदार हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम पाहत असल्याची थाप या महिलेने कुलकणी दाम्पत्याला मारली. तर कुलकणी यांच्या भाच्यास नोकरी लावण्यासाठी 25 लाख देण्याचे कबूल केले. यातील 20 लाख रुपये 16 सप्टेंबर रोजी रोख देण्यात आले. तसेच उर्वरित 5 लाख नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर घेण्याचा करारनामा बॉण्ड पेपरवर करण्यात आला.
सामंत यांनी दिले कारवाईची आदेश...
उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या नावाने कोणीतरी महिला पैसे उकळत असल्याची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आरोपी महिला सुरेखा काटेच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर कुलकणी दाम्पत्याने सुरेखाला 20 लाख रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर कायदेशीर बाजू तपासून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कपिल पाटलांसोबतही घडला होता असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (MP Kapil Patil) यांच्यासंदर्भात देखील असाच काही प्रकार घडला होता. अज्ञात ठगाने त्यांच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट (Facebook Account) उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून पैशांची मागणी केली असल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर याप्रकरणी कपिल पाटील यांच्या वतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police station) अज्ञात ठगाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सायबर पोलिसांकडून कपिल पाटील यांच्या नावाने बनवण्यात आलेलं फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आला होते.
पक्षातील नेत्याच्या जाचास कंटाळून तालुकाध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंना पत्रही लिहलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)