Devendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरु
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत....यावेळी त्यांनी नितीन गडकरींची सदिच्छा भेट घेतली.. यानंतर आता फडणवीस राजनाथ सिंह यांच्या घरी दाखल झालेत.. दरम्यान थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचणार आहेत..शपथ घेतल्यानंतर दिल्लीत फडणवीस आणि अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतं आहेत.. दरम्यान यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.. एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळतेय..
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना तर अजित पवार ३ वाजता निघणार, शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी, शाह आणि नड्डांची घेणार सदिच्छा भेट
दिल्ली - मुख्यमंत्री देवेन्द्र फडववीस दिल्लीतील नितीन गडकरींच्या घरी दाखल
---
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
----
देवेंद्र फडणवीसांची गडकरींसोबत दिल्लीत चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत बैठकसाठी जाणार आहेत..
दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता कमी आहे..
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
दिल्लीतल्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता