एक्स्प्लोर

Aurangabad Crime News: बायको गेली माहेरी, त्याने व्हिडीओ कॉल केला अन् जीवन संपवलं

Aurangabad Crime News: या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदवाडीतील शाहूनगरातील 29 वर्षीय रिक्षा चालकाने मावसभावाला व्हिडीओ कॉल (Video Call) करत गळफास घेतला. ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. अमोल उत्तम खाडे (रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोलचे साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षांची मुलगी असून, पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी आहे. दरम्यान शनिवारी अमोलने राहत असलेल्या भाड्याच्या घरातून सायंकाळी ज्योतिनगर परिसरात राहणाऱ्या आपल्या मावसभावाला व्हिडीओ कॉल केला. या कॉलवर बोलता असतानाच अमोलने आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 

आपल्या मावस भावासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अमोल किचन ओट्याजवळ होता. तिथे नायलॉनची दोरी लटकलेली असून फास त्याने गळ्यात घातल्याचे व्हिडिओ कॉलमध्ये रेकोर्ड झाले आहे. यावेळी अमोलला त्याच्या मावसभावाने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत अमोलने गळफास घेतला होता. दरम्यान नातेवाईक, मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी अमोलला तपासून मयत घोषित केले. पुढील तपास मुकुंदवाडी पोलिस करत आहेत. नातलगांच्या म्हणण्यानुसार, पत्नी नांदायला येत नसल्याने अमोलने आत्महत्या केली असावी. पण पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. 

भावाने समजवण्याचा प्रयत्न केला...

अमोलने राहत असलेल्या भाड्याच्या  घरातून सायंकाळी ज्योतीनगर परिसरात राहणाऱ्या आपल्या मावसभावाला व्हिडीओ कॉल केला. दरम्यान यावेळी त्याने घरात लटकवलेला गळफास देखील दाखवला. यावेळी अमोलला त्याच्या मावसभावाने समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच असे टोकाचे पाऊल उचलू नको असे सांगण्याचा प्रयत्न देखील केला. पण तोपर्यंत अमोलने गळफास घेतला होता. याची माहिती अमोलच्या मावसभावाने तत्काळ इतर नातेवाईकांना दिली. पण अमोलला रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसात नोंद... 

अमोलने राहत असलेल्या भाड्याच्या  घरात आत्महत्या केल्याची महिती त्याच्या मावसभावाने इतर नातेवाईकांना दिली. दरम्यान याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तर अमोलने आत्महत्या का केली याचा तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

इतर महत्वाची बातमी:  

Aurangabad News: एटीएम फोडले औरंगाबादेतील कन्नडला अन् सायरन वाजले मुंबईला; एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
Embed widget