धक्कादायक! पोलिसच निघाला लुटारू, सराफा व्यापाऱ्याला अडवून सोनं, साडेआठ लाख रुपये लुटले
Aurangabad News: संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Aurangabad Crime News: पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ ( सोयगाव पोलीस ठाणे), रामचंद्र दहिवाळ (रा. शेंद्रा औरंगाबाद) आरोपींचे नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र दहिवाळ सराफा व्यापारी आहे. तर संतोष वाघ आणि त्याची चांगली ओळख आहे. त्यामुळे दोघांनी मिळून लुटमारीचा कट रचला. यासाठी रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (वय- 53 वर्षे, रा.प्लॉट नं.13, सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना सोने दाखवण्याच्या बहाण्याने औरंगाबाद येथे बोलावुन घेतले. रामचंद्र दहिवाळ सुद्धा सराफा व्यापारी असल्याने अशोक विसपुते यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सोनं घेऊन औरंगाबादला आले.
असा रचला कट...
अशोक विसपुते यांची लुट करण्याचं संतोष वाघ आणि रामचंद्र दहिवाळ यांच्यात आधीच ठरलेलं होतं. त्यानुसार अशोक विसपुते आल्यावर दहिवाळने त्यांची भेट घेऊन सोन्याची पाहणी केली. मात्र त्यानंतर व्यवहार जमणार नसल्याचे सांगत काढता पाय घेतला. व्यवहार हुकल्याने अशोक विसपुते परत निघाले असतानाच संतोष वाघने शोक विसपुते यांना केंब्रिज चौकात अडवले.
अशी केली लूटमार...
अशोक विसपुते परत निघाल्याचे पाहून लक्ष ठेवून असलेला संतोष वाघने त्यांना अडवले. कुठे जात आहात,गाडी बाजूला घ्या सांगत त्यांना अडवले. तसेच आपण पोलीस असल्याचे सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे असलेलं 26 तोळे सोनं आणि साडेआठ लाख रुपये कॅश काढून घेतली. लुटमार करून वाघ तेथून फरार झाला.
पोलिसात गुन्हा दाखल...
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अशोक विसपुते यांनी सिडको एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामचंद्र दहिवाळ सराफा आणि संतोष वाघ यांच्याविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींना अटकही केली आहे. मात्र या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! चोर समजून तरुणाला मारहाण, उपचार सुरु असतानाच सोडला जीव
Aurangabad: औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चंदन चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या