Aurangabad News : 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला, लंडनचा एडवर्ड आणि औरंगाबादची सांची अडकले विवाहबंधनात
Aurangabad News: एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते.
Aurangabad News : लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे (London) पाहुणे नाच-नाच नाचले... नवरदेव एडवर्ड घोड्यासोबत... तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. औरंगाबादची सांची इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने (Indian Marriage) हा विवाह सोहळा पार पडला.
दोन्ही कुटुंबाचा लग्नासाठी होकार, अट मात्र एकच होती..
भारतीय गाण्यावर (Indian Wedding) थिरकत लंडनचे क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात ही सगळी मंडळी सहभागी झाली. लंडनचा एडवर्ड हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते. तीन वर्षांनी लग्नाबाबत घरी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला. अट मात्र एकच होती की, लग्न भारतात म्हणजे औरंगाबादमध्ये व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने झाले पाहिजे.
जातीपातीच्या भिंती, सीमेची बंधनं तोडून लग्न
ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एक तासाचा सोहळा असतो. मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचं सोहळा आहे आणि हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या (Edward) वडिलांनी दिली. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचा सांगितलं. तर जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा आनंद आहे असे मुलीच्या वडिलांनी सांगितलं.
'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला'
सांची आता कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली. या निमित्ताने लग्नामुळे ब्रिटिश आणि एका भारतीय कुटुंबाची नाळ भारतीय पद्धतीने घट्ट जोडली गेली. मानपान झालं... मुंडावळ्या बांधल्या... आणि मग मंगलाष्टका... सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली... लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... आता या लग्नानंतर कुणी तरी 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबाद'ला (Auranbad- Londan Marriage) साकारायला हरकत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :