(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यू ट्यूबवर दोन व्हिडीओ पोस्ट करुन हर्षवर्धन जाधव यांचे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप
राजकारण सोडलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. यू ट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करुन कौटुंबिक वादापासून लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक बाबींवर हर्षवर्धन यांनी रावसाहेब दानवेंवर आरोप केले आहेत.
औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. "माझा फोन टॅप आहे. त्यामुळे कोण मला फोन करतं, कोण एसएमएस करतं याची सगळी माहिती केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते, असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करुन हा आरोप केला आहे.
राजकारण सोडलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब जाधव यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले आहेत. हर्षवर्धन यांनी यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून घरगुती गोष्टी चव्हाट्यावर आणल्या आहेत. अगदी संजना आणि हर्षवर्धन यांच्या लग्नापासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक बाबींवर हर्षवर्धन यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले आहेत.
आरोप क्रमांक 1 पाहिलं मूल झाल्यावर माझ्या बायकोने संबंध तोडले. ती कधीही माझ्यासोबत चांगली वागली नाही. अखेर मला मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घ्यावे लागले. 2004 मध्ये मला शिवसेनेची ऑफर होती. मात्र ती तुम्ही मला कळवली नाही, कारण जबाबदारी त्यांच्यावर दिली होती.
आरोप क्रमांक 2 आम्ही 40 वर्ष राजकारणात होतो, आम्ही लोकांचा विकास केला. तुम्ही स्वतःचा विकास केला. म्हणून आज तुम्ही हेलिकॉप्टरमधून फिरत आहात. मी आमदारकीच्या काळात धारण बांधली. आमच्याकडे धरण तर तुमच्याकडे दुष्काळ आहे. कारण तुम्ही मतदारसंघात विकास केला नाही. त्यामुळे भाजपचं कमळ सोडून जालना लोकसभा मतदारसंघात उभा राहा, पाहू तुम्हाला किती मतं मिळतात?
आरोप क्रमांक 3 रावसाहेबांच्या छळाला कंटाळून अंदूरच्या किल्ल्यावर जीव द्यायला गेलो होतो. मेंटल हॉस्पिटलमध्येही गेलो. मला त्रास देऊ नका मी आत्महत्या करेन. तुम्हाला गुंडागिरी शिवाय दुसरा काही येत नाही. तुम्ही मला गुंड पाठवून मारु शकाल, असं या आरोपात म्हटलं आहे. 20 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन म्हणतात, "लोक म्हणतात माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले. पण मी आतापर्यंत सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो आहे.
आरोप क्रमांक 4 रावसाहेब दानवे यांनी केवळ रागातून माझ्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मला हे पोलिसांनी सांगितलं. मी तुमच्याशी बोलण्यासाठी दिल्लीत आलो, तर तुम्ही मला धमकावले, माझ्यावर, माझ्या आईवर गुन्हा दाखल करणार अशी धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरुन तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात.
आरोप क्रमांक 5 तुम्ही राजकारण करताना घरं भरली, आम्ही लोकांची कामं केली ही आमची संस्कृती आहे. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्च्यांवर बसून जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवून अपमान करता? दानवेसाहेब तुम्ही किती शिकला आहात? माझे वडील आयएएस अधिकारी होते आणि तुम्ही चौथी पास असून जास्त पैसे कमावले. कारण पैसे कमावणे हे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन दोन महिने तुम्ही दिल्लीला ठेवलं. तुम्ही तुमच्या मुलीला काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या देत राहिला. तुम्ही मला म्हणता तुझ्या मागे कुणी नाही, मग लोकसभेत आणि विधानसभा निवडणुकीत मला मतं कुणी दिली? जनता माझ्या मागे आहे, तुमच्यात दम असेल तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्ष श्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही.
आरोप क्रमांक 6 तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही याला धरुन कापून टाकू, मात्र मी तुमचे छक्के पंजे असणारे व्हिडीओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली तर तुम्हीही वाचणार नाही. तुमच्या मुलीला तुम्हाला आमदार करायचं असेल तर करा. मी मदत करेन, माझी जनता आहे. मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं, मी आधीच जाहीर केलं आहे करा संजनाला आमदार करा.
आरोप क्रमांक 7 तुम्ही मला मदत तर केली नाहीच, पण माझ्या कार्यकर्त्यांकडून 10 टक्के घेतले आणि त्यांना निधी दिला, गावाची नाव सांगतो. मला त्रास देऊ नका, मी कन्नडमध्ये येणार सुद्धा नाही. तुम्हीही जगा आणि मलाही जगू द्या. तुम्ही म्हणाल यांने व्हिडीओ टाकला, याला ठोकून काढतो काढा. तसाही मी मेंटल हॉस्पिटलमधूनच आल आहे. मी अंतुर किल्ल्यावर सुद्धा जीव द्यायला गेलो होतो, तुम्हाला वाटतं ते करा. तुमच्याकडे अमित शाह आहेत काहीही करु शकता. मी जीव देईन आणि तुमचे व्हिडीओ व्हायरल होतील लक्षात ठेवा.
मला जगू द्या विनंती आहे, मी माझा एक बंगला सुद्धा देऊन टाकतो तुम्हाला. प्लॉट मला राहू द्या, तो तुम्ही मला सोडणार नाही, तुम्ही 20 हजार कोटींची मालक आहेत तरी तो प्लॉट तुम्ही मला सोडणार नाही, तुम्हाला फार हाव आहे. आता मी कोचीन ला जातोय तुम्ही मला अडकवला त्रास दिला तर माझ्या जवळ सायनाईडच्या गोळ्या आहेत. तुम्ही लफडी केली तर मी जीव देईन आणि मग तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. गुंडगिरी पलीकडे तुम्ही काही करु शकत नाही. माझा जीव ज्यादिवशी जाईल त्यादिवशी तुम्ही उघडे पडाल म्हणून समजा.
हर्षवर्धन जाधव यांनी आज दुसरा व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केला. त्यात हर्षवर्धन काय म्हणाले तेही पाहूया "माझा फोन टॅप आहे. त्यामुळे कोण मला फोन करतं, कोण एसएमएस करतं याची सगळी माहिती केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते. माझी हिंमत वाढवण्याच्या प्रयत्नात तुम्हीच खपाल, असं नको व्हायला. मला फोन करणाऱ्यांवर त्यांची बारीक नजर आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मला फोन करु नका आणि माझ्याशी संपर्क ठेवू नका.
मी रावसाहेबांच्या मुलाच्या लग्नात 50 लाखांची गाडी गिफ्ट केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. इतकं करुनही रावसाहेब माझ्यावर उलटत असतील तर तुम्ही कुणीच नाही. झाला तेवढा तमाशा खूप झाला आता यापुढे मी पण व्हिडीओ टाकणार नाही. मात्र संजनाने आता कन्नड मतदारसंघात फिरावे आणि लोकांची सेवा करावी. त्यांनी रावसाहेब दानवेकडून थोडे पैसे आणावे आणि लोकांची सोय करावी माझ्याकडे आता पैसे नाहीत, तिने असं काम केलं तर तिला याचा पुढे फायदा होईल."