एक्स्प्लोर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 'मास्कद्वेष' अंगलट?; मास्क घालत नसल्यानं औरंगाबादेत तक्रार

मास्क घालत नसल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळं राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप तक्रारीत करण्य़ात आला आहे.

औरंगाबाद : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. आता  राज ठाकरे यांची मास्कद्वेश अंगलट येण्याची चिन्ह दिसत आहे. विनामास्क फिरण्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला असून अ‍ॅड.रत्नाकर चौरे यांनी केली राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरे यांच्या विरोधात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी तक्रारदारांनी केली आहे. राज यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळं राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप यात करण्य़ात आला आहे.

राज ठाकरे एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विना मास्क दिसून आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना देखील 'मास्क काढा' अशा सूचनाही दिल्या.

राज ठाकरेंचा 'मास्कद्वेष'! नाशिकमध्येही विना मास्क, स्वागताला आलेल्या माजी महापौरांना म्हणाले 'मास्क काढा'

दरम्यान राज ठाकरे यांचे औरंगाबाद आणि पूर्व महाराष्ट्रात लोखो चाहते आहेत. त्यांमुळे त्यांना आदर्श मानून मास्क न घालण्याचा पायंडा चालू ठेवण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागल्यास त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असं तक्रारदार अ‍ॅड.रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी विनामास्क हजेरी लावल्याचं समोर आलं होतं. तसंच मी मास्क घालणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं होतं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला देखील ते विनामास्क उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क! गर्दीबाबत विचारल्यावर भडकले, म्हणाले...

अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत बोलताना मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, "काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

"दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget