मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क! गर्दीबाबत विचारल्यावर भडकले, म्हणाले...
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला ते विनामास्क उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला ते विनामास्क उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
मी मास्क घालतच नाही
ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठी भाषा गौरव दिन आल्यावर सरकारला जाग येते
राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सरकारच्या मनात आहे की नाही? याबाबत माहिती नाही. यांना फक्त संभाजीनगरसारखं करायचं आहे. हा दिवस आल्यानंतर सरकारला जाग का येते. त्यांना असं का बोलावसं वाटतं. सरकारला तुम्ही या गोष्टी विचारायला हव्यात, असं राज ठाकरे म्हणाले.
Marathi : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...
ते म्हणाले की, स्वाक्षरीची मोहिम पहिल्यांदा होतेय असं नाही. माझी विनंती आहे की, मराठी बांधवांनी स्वाक्षरी मराठीतून करावी. मी सगळीकडे मराठीतच सही करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवं गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले.
कलाकारांच्या आत्महत्यांसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, माझ्याकडे काही कलाकार येऊन गेले. त्यांच्यासाठी काही थिएटर्स उघडले गेले. कलाकारच नाही तर सगळेच अडकले होते. सगळेजण सावरत आहेत.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















