एक्स्प्लोर

"दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायमच मास्कशिवाय दिसतात. त्यावरुन अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. "अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय?" असं पवार म्हणाले.

मुंबई : "काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत उत्तर देत होते.

"मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी "मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय", असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला.

अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही सोडलं नाही. दरेकरांचं जॅकेट बघूनच कोरोना त्याच्या जवळ गेला नसेल असं म्हणत सभागृहात हसायला लागले.

"एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना झाला नाही. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा प्रवीण दरेकर यांचे जॅकेट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं, असंही काही झालं असेल तर माहित नाही," असं अजित पवार म्हणाले.

माझ्यावर बिल फाडू नका! "तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असे म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका," असे म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने 'प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं म्हणताच अजित पवारांनी प्रसादने मलाही जॅकेट दिलं होते,' असे सांगितले.

पुरावे द्या कारवाई करु राज्यात सर्व जिल्ह्यात आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आले, असे करुनही संकट काळात विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरु आहे. परंतु विरोधकांनी भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितावर तात्काळ कारवाई करु, असे स्पष्ट केले. या काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या राजकारणामुळे त्या बदल्या झाल्या नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी खोडून काढले.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget