एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटनांनी संताप, आरोपी गजाआड

Aurangabad Crime News :  एकाच दिवसी अत्याचाराच्या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबाद हादरलं आहे.  49 वर्षीय महिलेवर आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.  

Aurangabad Crime News :  एकाच दिवसी अत्याचाराच्या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबाद हादरलं आहे.  49 वर्षीय महिलेवर आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आले असून, 49 वर्षीय महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने बळजबरीने बलात्कार केला आहे. पतीची दारू सोडण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला आपल्या घरी बोलवत एकटी असल्याचा फायदा घेत बलात्कार केला आहे. पुंजाराम कचरु दंवगे ( रा. मनूर ता.वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

याने पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका गावात त्या आपल्या पतीसोबत रहातात. तर त्यांचे पती आयशर गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम करीत असल्याने त्यांना दारूचे व्यसन आहे. तसेच ते गाडीवर चार- पाच दिवस बाहेरगावी जात असतात. त्यांच्या याच दारू पिण्याच्या सवयीमुळे पिढीत महिला वैतागली होती. त्यामुळे आपल्या पतीची दारु सोडविण्यासाठी पीडित महिलेकडून सतत प्रयत्न सुरू होते. दरम्यान महिलेची ओळख  आपल्याच तालुक्यातील एका गावातील पुंजाराम कचरु दंवगे याच्यासोबत झाली होती. ओळख झाल्याने अनेकदा बाजारात व इतर ठिकाणी भेटल्यानंतर पीडित महिला आणि पुंजाराम बोलायचे. त्यामुळे एक दिवस बोलतांना आपल्या पतीला दारू पिण्याची सवय असून, ती सोडवण्यासाठी औषध मिळेल का याबाबत देखील पुंजाराम यांच्याशी पीडित महिलेने चर्चा केली.

महिलेला घरात एकटी पाहून केला बलात्कार....

पीडित महिलेने आपल्या पतीला दारू सोडवण्यासाठी औषधाची विचारणा केली असता पुंजाराम याने आपणच असे औषध देतो असं महिलेला म्हणाला. दरम्यान एक वर्षांपूर्वी पुंजाराम महिलेला भेटल्यावर, तु माझ्या मनुर येथील गावात ये मी तुला दारु सोडण्याचे औषध देतो असे म्हणाला. त्यामुळे महिला दुपारी 12 वाजता  पुंजाराम यांने बोलवल्याप्रमाणे त्याच्या मनुर येथील पडक्या घरात गेले. यावेळी घरात कोणीच नव्हतं. तर महिलेनी यावेळी पतीची दारू सोडवण्यासाठी औषधाची मागणी केली. पण महिलेला एकटीच पाहून पुंजाराम याने तिच्यासोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण पुंजाराम याने तोंड दाबुन महिलेवर बळजबरीने बलात्कार केला.

महिलेवर अत्याचार केल्यावर आरोपीने ही बाब कुणाला सांगितल्यास घरच्यांसह तुलाही जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर त्यांने पुन्हा दोन वेळा धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. तर गेल्या काही दिवसांपासून आरोपी हा महिलेला पून्हा धमकी देऊन आपल्या घरी येण्यासाठी सांगत असल्याने महिलेने अखेर घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.त्यामुळे अखेर याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्यात पुंजाराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

दुसऱ्या एका घटनेत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 18 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहरातील सतरा वर्षांच्या मुलीला 22 सप्टेंबर 2021 ते 15 जुन 2022 दरम्यान गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील 18 वर्षीय तरुणाने गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवार व कन्नड तालुक्यातील मोहडी येथे नेवुन तिच्या मर्जीविरूध्द तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये 17 नोव्हेंबर रोजी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget