एक्स्प्लोर

औरंगाबादेत भाजपला धक्का, माजी शहराध्यक्षासह 8-10 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर गजानन बारवाल हे हाती शिवबंधन बांधणार आहेत.

औरंगाबाद : एकीकडे नवी मुंबईत भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असताना दुसरीकडे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्याचबरोबर माजी महापौर गजानन बारवालही हाती शिवबंधन बांधणार आहेत. तनवाणी यांच्यासोबत 8 ते 10 नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या औरंगाबादेत रंगली आहे. राज्यात महाराष्ट्र विकासआघाडी सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामपंचायत, महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक यासारख्या स्थानिक पातळीवर पक्षांतर होत आहे. त्यात आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. किशनचंद तनवाणी आणि गजानन बरवाल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' इथे भेट घेणार आहेत. या भेटीत तनवाणी शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान किशनचंद तनवाणी यांची ही घरवापसी असेल. तनवाणी हे मूळचे शिवसेनेचेच आहेत. शिवाय ते शिवसेनेचे आमदारही होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला रामराम केला होता. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीने निवडणुकीला सामोरी जाण्याच्या तयारीत आहे. तर मनसे आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे. औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना - 29 भाजप - 22 एमआयएम - 25 कॉंग्रेस  - 10 राष्ट्रवादी - 03 बसप - 05 रिपब्लिकन पक्ष - 01 अपक्ष - 18
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget