Aurangabad Crime : भंगार विक्रेत्याचा सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा; बनावट बिलांमार्फत फसवणूक, जीएसटी विभागाकडून अटक
Aurangabad Crime News : भंगार विक्रेत्यानं सरकारला तब्बल 200 कोटींना गंडा घातला आहे. बनावट बिलांमार्फत या भंगार विक्रेत्यानं फसवणूक केली आहे. जीएसटी विभागाकडून अटक या भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.
Aurangabad Crime News : दिल्लीतील भंगार विक्रेत्यानं सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा घातला आहे. जीएसटी इनपुट क्रेडिटच्या माध्यमातून विक्रेत्यानं ही फसवणूक केली आहे. या भंगार विक्रेत्यानं भंगार विक्री न करताच बनावट बिलं तयार करून सरकारची 200 कोटींची फसवणूक केली आहे. भंगार विक्रेता समीर मलिक याला जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या भंगार विक्रेत्याच्या औरंगाबादमधील दुकानांवर छापेही टाकण्यात आले आहेत.
सरकारला जवळपास दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील एका भंगार विक्रेत्याला जीएसटी विभागानं अटक केली आहे. समीर मलिक असं भंगार विक्रेत्याचं नाव आहे. हा आरोपी भंगार विक्रीचा कोणताही व्यवहार करत नव्हता. बनावट बिलं तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून सरकारला जवळपास त्यानं दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गंडा या व्यापारानं घातला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यात सहभागी झालेल्या औरंगाबादमधील वाळूज, हनुमान नगर येथील एका भंगार दुकानावरही धाड टाकण्यात आली आहे. त्यातून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औरंगाबादमधील 15 व्यवसायिक आहेत. ज्यांच्याकडे त्यांनी बनावट बिलाच्या आधारावर व्यवहार केला आहे. मूळचा दिल्लीचा असणारा समीर मलिक यांनं औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात सनसाईज एंटरप्रायजेस नावानं भंगार खरेदी विक्री व्यवसायाची बोगस नोंदणी केली होती. त्या बोगस कंपनीच्या नावावरून कोट्यवधींची बोगस बिलं तयार केली आहेत. त्यातून जवळपास दहा कोटी रक्कम औरंगाबाद शहरातील पंधरा व्यवसायिकांना पाठवली होती. या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचं जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादमध्ये बोलवून घेतलं आणि अटक केली. यामध्ये औरंगाबादमधील पंधरा भंगार विक्रेते असल्याचं जीएसटीच्या लक्षात आल्यानं कारवाई सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती परराज्यातही आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- असंवेदनशीलतेचा कळस! पाच वर्षांपूर्वीच्या भ्रूणहत्येच्या 'त्या' प्रकरणी अद्याप सरकारी वकिलाची नियुक्ती नाही
- Solapur Crime : शस्त्रांचा धाक दाखवून विकृत कृत्य करणाऱ्या चौघांना अटक; सोलापूर पोलिसांची कारवाई
- सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार; ईडीला पाठवलं पत्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha