Corona Vaccination: औरंगाबादेतील कोरोना लसीकरण ठप्प, नवीन लसींची प्रशासनाकडे मागणी
Corona Vaccination: महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोरोनाच्या कोणत्याही लसीचा एकही डोस शिल्लक नसून, शहरातील लसीकरण पूर्णपणे थांबले आहे.
Corona Vaccination: जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) थैमान पाहायला मिळत असताना, भारतात देखील आरोग्य विभाग अलर्ट झालं आहे. दरम्यान कोरोनावर मात मिळवण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम देशभरात राबवली जात आहे. मात्र असे असतांना औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) कोरोना लसीकरण (Corona Vaccination) ठप्प पडले आहे. कारण औरंगाबाद महापालिकेकडील कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसींचा तब्बल 14 हजार लसींचा साठा कालबाह्य ठरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोरोनाच्या कोणत्याही लसीचा एकही डोस शिल्लक नसून, शहरातील लसीकरण पूर्णपणे थांबले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली. परिणामी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सिन लसीचे सोळा हजार डोस पडून होते. त्याची एक्सपायरी डेट 1 जानेवारी होती. शेवटच्या टप्प्यात महापालिकेने लसीकरणावर जोर दिला. तरी त्यातील 2 हजार लसीच संपल्या. 31 डिसेंबर रोजी महापालिकेकडे 14 हजार कोव्हॅक्सिन लसी उरल्या होत्या. 31 डिसेंबर रोजी सायंकाळीच त्या फिजरमधून बाहेर काढून ठेवण्यात आल्या. आता या लसी वापरता येणार नाहीत. त्यामुळे महानगरपालिकाकडे आता लसीचा एकही डोस शिल्लक नसून, शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे.
नवीन लसी कधी येणार!
औरंगाबाद महानगरपालिकेकडे असलेला 14 हजार लसी कालबाह्य झाल्याने आता त्या वापरता येणार नाही. त्यामुळे शहरातील लसीकरण सद्यातरी पूर्णपणे बंद आहे. तर मनपाच्या आरोग्य विभागाकडून शासनाकडे 75 हजार नवीन लसींची मागणी करण्यात आली आहे. ज्यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कार्बोव्हॅक्स लसींचा समावेश आहे. त्यामुळे आता या नवीन लसी कधी मिळणार याकडे मनपाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या नवीन लसी आल्यावरच शहरातील लसीकरण पुन्हा सुरु होईल.
लसी फेकून देणार
मनपाकडील कोविशिल्ड आणि कार्बोव्हॅक्स लसींचा साठा आधीच संपलेला होता. केवळ कोव्हॅक्सिनचा साठा तेवढा उपलब्ध होता. तोही शनिवारी कालबाह्य ठरला. चौदा हजार लसी फ्रिजरमधून बाहेर काढून ठेवल्या. आता या कुपींमधून लसींचा मात्रा फेकून दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले.
पुन्हा चिंता वाढली...
सद्या चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होतांना पाहायला मिळत आहे. तर राज्यात देखील रोज नवीन रुग्ण आढळून येत आहे. अशात आता पुन्हा एकदा लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. तर कोरोनाचा धोका पाहता वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहे. मात्र असे असली तरीही जगभरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे.
Second Booster Dose : कोरोनाचं संकट, देशात अलर्ट; दुसरा बूस्टर डोस घ्यावा लागणार? सरकारमध्ये खलबतं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )