Aurangabad News: शिंदे गटाचे आमदार बोरनारे आणि पोलिसांमध्ये हुज्जत; गाडी अडवल्याने झाला वाद
Ramesh Bornare: थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला.
Ramesh Bornare: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडत आहे. मात्र याच बैठकीसाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने आमदार बोरनारे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलीस आणि बोरनारे यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तर सर्व आमदारांच्या गाड्या सोडत असताना फक्त माझीच गाडी पोलिसांनी अडवली असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. त्यामुळे थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 च्या आराखड्याची बैठक अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकरी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान याचवेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या ड्रायव्हर आणि पोलिसांत गाडी आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला. त्यानंतर याची माहिती मिळताच स्वतः आमदार रमेश बोरनारे घटनास्थळी आले. सर्वच आमदार यांच्या गाड्या सोडल्या असताना फक्त माझीच गाडी का अडवत असल्याचा त्यांनी पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे बोरनारे आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात