एक्स्प्लोर
औरंगाबादच्या पोखरी गावचा आदर्श, धार्मिक खर्चाला फाटा देत शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा ध्यास
लोकं आता जमेल तसे लोक वर्गणी द्यायला लागले आहेत. कोणी 5 हजार ते कोणी लाख रुपये दिले आहेत. तरुण पोरांच्या निर्णयाचे गावातल्या वयोवृद्धांनी देखील स्वागत केले आणि त्यांच्यासोबतच गावचा सप्ताह साध्या पद्धतीने करतात. लोकांनी लोकवर्गणीतून गावची शाळा सुधारण्याला प्रेरणा दिली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद येथील पोखरी गावानं अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श वाटावा असा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी धार्मिक खर्चाला फाटा देत गावातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा ध्यास घेतला आणि यासाठी गावकऱ्यांनी ओल्या दुष्काळाचा निधीदेखील शाळेच्या विकासाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात मारुती, महादेव ,श्रीकृष्ण, कालिकामाता अशी सहा मंदिरं आणि दरवर्षी होणारे 8 ते 10 लाख खर्चाचे सप्ताह ही गावाची पंचक्रोशीतील ओळख. गावात 8 वी पर्यंत जिल्हापरिषदेची शाळा आहे. चार वर्ग बरे तर 4 वर्ग मोडखळीस आलेले आहेत. यामुळे गावकऱ्यांनी ही गावाची ओळख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या ग्रामपंचायतीनं बैठक बोलावली आणि गावातील धार्मिक सप्ताहावर होणार खर्च कमी करून गावातील जिल्हापरिषदेची शाळा आतंरराष्ट्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे.
गावाच्या या विचाराचे रूपांतर काही दिवसात चळवळीत झालं आहे. लोकं आता जमेल तसे लोक वर्गणी द्यायला लागले आहेत. कोणी 5 हजार ते कोणी लाख रुपये दिले आहेत. तरुण पोरांच्या निर्णयाचे गावातल्या वयोवृद्धांनी देखील स्वागत केले आणि त्यांच्यासोबतच गावचा सप्ताह साध्या पद्धतीने करतात. लोकांनी लोकवर्गणीतून गावची शाळा सुधारण्याला प्रेरणा दिली आहे.
चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यंदा गावाला ओल्या दुष्काळामुळे मिळालेले 54 लाखांची मदत मिळाली आहे. ही मदत देखील गावच्या शाळेला देण्याचा निर्णय घेतला आङे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांनी आपल्या वडिलांचा सत्कार केला आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गावाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो आहे.
गावातील इतर गावांमध्ये नोकरीला असलेल्या नोकरदारांनी देखील एक ग्रुप बनवला आणि जमेल तेवढी मदत शाळेला केली आहे. आतापर्यंत गावकर्याकडे दहा लाख रुपये जमा झाले आहेत. गावालगत ज्ञानेश्वर ठुबे यांची काही जमीन आहे. ही जमीन देखील शाळेला अर्ध्या किमतीत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच जागेवर शाळेची भव्य इमारत उभी राहणार आहे. या इमारतीला शासनाचा निधी मिळणार नाही याची चिंता गावकऱ्यांना नाही. या गावकर्यांना घेतलेला निर्णय हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि इतर गावांनाही नवा आदर्श देणार आहे हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement