Amrendra Mishra Wife : आधी नवरा मला म्हणाला, मुझे फसाया गया, आता बायको म्हणते, नवऱ्याचा कोठडीत छळ, मॉरीसच्या बॉडीगार्डच्या पत्नीची एकनाथ शिंदेंकडे मदतीची याचना
Amrendra Mishra Wife : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नोरोव्हाचा (Mauris Noronha) बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता अमरेंद्र मिश्रा (Amrendra Mishra) याची पत्नी सोनी मिश्रा (Soni Mishra) हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
Amrendra Mishra Wife : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नोरोव्हाचा (Mauris Noronha) बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता अमरेंद्र मिश्रा (Amrendra Mishra) याची पत्नी सोनी मिश्रा (Soni Mishra) हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचे सोनी मिश्रा हिने म्हटले आहे.
काय म्हणाली बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राची पत्नी
मॉरिस नोरोव्हाच्या बॉडीगार्डची पत्नी सोनी मिश्रा एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी करताना म्हणाली, "माझ्या नवऱ्याला षडयंत्रात अडकवण्यात आलंय. पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात येत आहे. त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात येत आहे. शिवाय, त्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. पोलीस कोठडीत माझ्या पतीसोबत काहीही घडू शकते. त्यांना सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी अमरेंद्र मिश्रा याच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोव्हा याने थंड डोक्याने गोळ्या झाडून हत्या केली. घोसाळकरांची हत्या केल्यानंतर मॉरिसने फेसबुक लाईव्ह करत स्वत:वर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी मोरिस नोरोव्हाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे.
उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात
घोसाळकर यांच्या हत्याकांडानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "महाराष्ट्रात हैदौस सुरु आहे. सरकारमध्ये एकप्रकारचे गँगवॉर आहे. शिवाय, अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोव्हा यानेच गोळीबार केला का? अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
नोरोव्हावर होते गंभीर आरोप
मॉरिस नोरोव्हा याच्यावर 2014 गंभीर आरोप करण्यात येत होते. 80 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग आणि 80 लाखांची फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये मॉरिस नोरोव्हा आरोपी होता. नोरोव्हाचा राजकीय क्षेत्रातील वावर फार वाढला होता. मॉरसच्या राजकीय महत्वकांक्षा वाढल्या होत्या. दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांचं वर्चस्व आहे. शिवाय मॉरिस काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत निवडणुकीसाठी तयारीही सुरु केली होती. त्यातूनच दोघांमधील वैमनस्य वाढीस लागले होते.
इतर महत्वाच्या बातम्या