Amravati Murder Case : उमेश कोल्हे खून प्रकरण, आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून दोन लाखांचे बक्षीस
Amravati Murder Case : आरोपी शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे NIA कडून सांगण्यात आले आहे.
Amravati Murder Case : अमरावतीच्या उमेश कोल्हे (Umesh Kolhe) खून प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद (Shamim Ahmed) उर्फ फिरोज अहमद याच्याविरुद्ध एनआयएने (NIA) रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे NIA कडून सांगण्यात आले आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्याच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपी शमीम अहमदचाही पोलिस शोध घेत आहेत. यापूर्वी एनआयएने मुदस्सर अहमद (22), शाहरुख पठाण (25), अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22), अतीब रशीद (22) आणि डॉ. युसूफ खान बहादूर खान (24) यांच्यासह सात आरोपींना ताब्यात घेतले होते. या हत्येमागे कथित मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम होता.
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून...
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला.
हत्येमागे पीएफआयचा हात?
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मौलवी मुश्फिकचा संबध पीएफआयशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हत्येमागे पीएफआयचा हात असल्याचा संशय एनआयला होता. त्या दिशेने एनआयने आपला तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख हा मौलवी मुश्फिक अहमदला आपला आदर्श मानतो. मुश्फिकच्या सांगण्यावरून नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट फॉरवर्ड केल्याने अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. एवढेच नाही तर आरोपींनी हत्येनंतर बिर्याणी पार्टी देखील केली. हत्येनंतर आयोजित करण्यात आलेल्या 'बिर्याणी पार्टी'मध्ये कोण सहभागी होते याचा देखील एएनआयकडून तपास करण्यात येत आहे..