(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साहेब आमच्याकडे लक्ष द्या; अमरावतीमधील कळमखार गावातील महिलांनी अडवला अजित पवारांचा ताफा
Amravati News Update : अजित पवार दोन दिवस अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी धारणी तालुक्यातील कळमखार गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केली. यावेळी महिलांची त्यांचा ताफा अडवला.
अमरावती : मेळघाटातील कळमखार गावात महिलांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्यामुळे या महिलांनी रोष व्यक्त केला. आदिवासी लोकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. अजित पवारांनी गाडीतून उतरून महिलांशी साधला संवाद सधात तातडीने समस्या निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
अजित पवार दोन दिवस अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी धारणी तालुक्यातील कळमखार गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यामध्ये आपल्या घरात नालीचे पाणी जात असल्याचे म्हणत, येथील महिलांनी अजित पवार यांचा ताफा आडवून रोष व्यक्त केला. तसेच मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोपही केला.
प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "मेळघाटात अंधश्रद्धा पाहायला मिळाली, अनेक महिलांच्या गळ्यात काळे दोरे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. येथील महिला बाबाकडे जाऊन उपचार घेतात. मुलांना शिक्षण देणारे गुरुजी दारू पिऊन येतात. त्यामुळे मुलांचं शिक्षण धोक्यात येते.
"येथील मेळघाट वासीयांना पारंपरिक धान्य मिळावं अशी त्यांनी केली आहे. अंडी, खिचडी आणि उसळ मिळते असे ते म्हणताय, पण काही केसेस आशा आहे की कमी वयात लग्न होत आहेत. बाजूलाच असलेल्या मध्यप्रदेशच्या मुली इकडे येतात आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्या परत मध्यप्रदेशमध्ये जातात. काही काही ठिकाणी चांगलं काम आहे तर कुठे कुठे वाईट स्थिती आहे. इथे अजूनही पंचनामे झाले नाहीये. ते ताबडतोब झाले पाहिजे असा आग्रह आम्ही धरू, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.
अजित पवार म्हणाले, "गरोदर असताना येथील महिलांना कामावर जावं लागतं. आपण सरकारी कर्मचारी महिलांना तीन महिन्याची सुट्टी देतो. जे मोल मजुरी करतात या वर्गाला तीन महिने सकस आहार आणि भत्ता दिला पाहिजे. मेळघाट मधील समस्यांना आधीची आणि आताची सरकारं जबाबदार आहेत. याबरोबरच अधिकारी आणि कर्मचारी हे देखील जबाबदार आहेत."
महत्वाच्या बातम्या