Amravati News : इन्स्टावर ओळख, बळजबरीने शारीरिक संबंध; अमरावतीमध्ये एकाच नराधमाचा दोन अल्पवयीन तरुणींवर अत्याचार
मुलींनी भेटण्यास नकार दिला असता आरोपी युवकाने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी बलात्कार व पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील एका 22 वर्षीय युवकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलींच्या वेगवेगळ्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री अत्याचारी युवकावर बलात्कार व पोस्कोअर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुर्यकांत सोनी (वय, 22) दर्यापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. वर्षं 2022 मध्ये 16 व 17 वयोगटातील या दोन अल्पवयीन मुलींशी इन्स्टावरून ळख झाली होती. त्यानंतर युवक हा दोन्ही अल्पवयीन मुलींना मागे पुढे भेटत होता. दरम्यान दर्यापूर हिंगणी रोडस्थीत वूदावन पाकॅ समोरील मोकळ्या जागेत कारमध्ये भेटण्यास बोलावून वर्ष 2022 ते 2025 या काळात अनेकदा इच्छा नसतानाही जबरदस्तीने शाररीक संबंध ठेवले. त्यानंतर मुलींनी भेटण्यास नकार दिला असता आरोपी युवकाने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी बलात्कार व पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
15 वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आईला बेड्या
दरम्यान, आठवडाभरापूर्वीच आईच आपल्याला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याची धक्कादायक उकल एका 15 वर्षीय मुलीने केली आहे. तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी तिच्या आईविरुद्ध 29 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. दहावीची विद्यार्थिनी असलेली पीडिता आईसह नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत राहत होती. तिच्या वडिलांचा आठ वर्षापूर्वी मृत्यू झाला. तिच्या आईने गतवर्षी रायपूर येथील एकाशी लग्न केले. दोघी मायलेकी येथेच राहतात. 20 जानेवारी रोजी ती प्रात्यक्षिकासाठी शाळेत गेली. घरी येण्यास वेळ झाल्याने ती कोणत्या तरी मुलासोबत आहे, असे तिच्या आईला वाटल्याने तिचा संताप झाला. 20 रोजी जानेवारी रोजी सायंकाळी पीडिताला तिच्या आईने घराच्या गॅलरीत थंडीत कोंडले. तुझा जीव घेणार म्हणत तिने तिला गॅसच्या पाईपने मानेवर मारहाण केली.
21 जानेवारी रोजी महिला बाहेर गेली असता पीडिताने गॅलरीमधील मॅट कापली व उडी घेऊन ती खाली उतरली. तिने मोठ्या आईचे घर गाठले. रात्रभर ती तेथेच होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले. आईने आपल्याला कोंडून ठेवले. मारहाणदेखील केली. ती नेहमीच त्रास देते, शिवीगाळ करते तसेच वेश्या व्यवसायास प्रवृत करते, जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे पोलिसांसह बालकल्याण समितीला सांगितले. यानंतर मुलीला बालसुधारगृहात पाठवून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
