एक्स्प्लोर

Amravati News : कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर, महावितरणला कंटाळून शेतकऱ्याची संत्रा बागेवर कुऱ्हाड

महावितरणला कंटाळून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आहे.

Amravati Agriculture News : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणला (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) कंटाळून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना घडली. अचलपूर (Achalpur) तालुक्यातील जवळापूर येथील गणराज कडू असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ही कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर पडत असल्याची भावनाही यावेळी  गणराज कडू (Ganraj kadu) यांनी व्यक्त केली. आपल्या शेतात विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गणराज कडू हे गेल्या काही दिवसांपासून सदर विभागाकडे तक्रारी करत होते. मात्र, त्यांना न्याय भेटला नसल्यानं त्यांनी 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याचा निर्णय घेतला.

Amravati News : कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर, महावितरणला कंटाळून शेतकऱ्याची संत्रा बागेवर कुऱ्हाड

शासनानं महावितरणवर योग्य ती कारवाई करावी

सरकार उत्पन्न वाढवा म्हणत आहे. मात्र, महावितरण व्यवस्थीत वीज पुरवठा करत नसल्याचे गणराज कडू म्हणाले. मी वेळोवेळी महावितरणकडे वीज पुरवठ्याबाबत तक्रारी दिल्या होत्या. मात्र, माझ्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे कडू म्हणाले. वीज नसल्यामुळं संत्रा बागेसह हरभरा आणि कांदा पिकाला पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. ही कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर पडत असल्याची भावनाही यावेळी  गणराज कडू यांनी व्यक्त केली. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण आहे. म्हणून शासनानं महावितरणवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील गणराज कडू यांनी केली.

फळगळतीमुळं आधीच शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यात गेल्या सहा ते सात वर्षापासून संत्राबागेमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. ही फळगळती जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात होते. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादकांनी फळगळतीची समस्या कायमची सोडवण्यासाठी नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रावर धडक देऊन वारंवार निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे संशोधन केले नसल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान सोसावे लागत आहे.  त्यामुळं काही संत्रा उत्पादकांनी आपल्या शेतातील संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली होती. दुसरीकडं संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊन त्यांचा पुरवठा कमालीचा घटला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Swabhimani Shetkari sanghatana : सोयाबीनसह कापूस, संत्रा उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मोर्शीत आक्रोश मोर्चा 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget