एक्स्प्लोर
गुजरातमध्ये अमित शाहंच्या सभेत तोडफोड

नवी दिल्ली: गुजरातमधील सुरतमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होऊन, सभेत तोडफोड झाली. या गोंधळामुळे सभेत अमित शाहंना केवळ चारच मिनिटेच बोलता आले. भाजपच्यावतीने पटेलांच्या वाढत्या नाराजीला दूर करण्यासाठी 44 पाटीदार नेत्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अमित शाह सभेच्या ठिकाणी पोहचले त्यावेळी 'अमित शाह गो बॅक'च्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या नंतर सभेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि अमित शाह बोलण्यासाठी उभे राहिले, त्यावेळीही गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्तांनी व्यासपीठाजवळ येऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. या सभेपूर्वीच या रॅलीवर पाटीदारांचे नेते नलिन कोटडीया यांच्या अटकेचे सावट होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाटीदारांनी सभेत गोंधळ घालत तोडफोड झाल्याचे समजते.


आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























